Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या मनात काय खुपतं, ते कोण काढणार? ट्विंकल खन्ना सांगते आईच्या मनातली अस्वस्थ गोष्ट

मुलांच्या मनात काय खुपतं, ते कोण काढणार? ट्विंकल खन्ना सांगते आईच्या मनातली अस्वस्थ गोष्ट

केवळ मुलांचा अभ्यास घेऊन परिपूर्ण आई होता येत नाही. मी माझ्या मुलीसाठी चांगली आई नाही ही भावना मलाही इतर अनेक आयांसारखी छळतेय. त्यासाठीचा उपाय माहिती आहे. तो जमला तर मुलांना तेच अपेक्षित आहे आणि हे जमवणं आताच्या आयांची मुख्य गरज आहे.. नेमकं काय जमायला हवं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:54 PM2021-12-17T13:54:26+5:302021-12-17T14:03:08+5:30

केवळ मुलांचा अभ्यास घेऊन परिपूर्ण आई होता येत नाही. मी माझ्या मुलीसाठी चांगली आई नाही ही भावना मलाही इतर अनेक आयांसारखी छळतेय. त्यासाठीचा उपाय माहिती आहे. तो जमला तर मुलांना तेच अपेक्षित आहे आणि हे जमवणं आताच्या आयांची मुख्य गरज आहे.. नेमकं काय जमायला हवं?

Twinkle Khanna wants to be a good and perfect mother...She urged every mother try to be good mother by reading their kid's mind | मुलांच्या मनात काय खुपतं, ते कोण काढणार? ट्विंकल खन्ना सांगते आईच्या मनातली अस्वस्थ गोष्ट

मुलांच्या मनात काय खुपतं, ते कोण काढणार? ट्विंकल खन्ना सांगते आईच्या मनातली अस्वस्थ गोष्ट

Highlights ट्विंकल म्हणते, मुलांचा अभ्यास, त्यांच्या भौतिक गरजा , आजारपणं याकडे लक्ष देऊन आपण परिपूर्ण आई होत नाही.आताच्या आधुनिक काळात पालकत्वाची भूमिका किती व्यापक आणि खोल झाली आहे याची ट्विंकलला जाणीव आहे. पालक म्हणून सतत मुलांच्या चुका आणि दोष दाखवत राहाणं हे ट्विंकलला एक पालक म्हणून मान्य नाही.

  उत्तम पालकत्त्व म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर काय असू शकेल. बहुतेकांना वाटेल की मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळणं, मुलं शैक्षणिक क्षेत्रात पुढे जाणं म्हणजे उत्तम पालकत्त्व. कारण पालकांनी मुलांच्या अभ्यासाकडे नीट लक्ष दिलं, ते नीट अभ्यास करता आहेत का? त्यांची प्रगती नीट होते आहे ना, याकडे बारीक नजर ठेवणं म्हणजे उत्तम पालकतत्व. आजचं स्पर्धेचं जग बघता बहुतांश पालकांना उत्तम पालकत्व म्हणजे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे, वरवरच्या त्यांच्या गरजांकडे लक्ष देणं हेच वाटेल. पण अभिनेत्री ट्विंकल खन्नाची उत्तम पालकत्त्वाची, परिपूर्ण आईची व्याख्या वेगळी आहे आणि ती तिने काहीही हातचं राखून न ठेवता सांगितली आहे.

Image: Google

एक अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्नाची कारकिर्द तशी छोटी होती. पण तरीही ट्ट्विंकल खन्ना काय म्हणते याची दखल बॉलिवूडमधले जसे घेतात तसे सामान्य लोकही घेतात. याचं कारण म्हणजे ट्ट्विंकल एक हुशार आणि सुजाण अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपली मतं कितीही टोकदार असली तरी ती ते स्पष्टपणे मांडते. वाचणं, लिहिणं, व्यक्त होणं, उघड्या डोळ्यांनी आणि मनानं अवतीभवतीचं जग अनुभवणं हा तिचा स्वभाव आहे. त्यामुळे ती जेव्हा कशावर परखड किंवा उपहासात्मक भाष्य करते तेव्हा तिला नेमकं काय म्हणायचं आहे ह  ट्विंकल खन्नाचं समाज माध्यमांवरील लेखन फॉलो करणार्‍यांना बरोबर कळतं. आताही एक आई म्हणून तिला तिच्यातल्या अपुरेपणाची जी जाणीव झाली ती तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन व्यक्त केली.

एक आई म्हणून आपण परफेक्ट नाही हे तिनं मोकळेपणानं सांगितलं आहे. याचं कारण तिने आपल्या पोस्टमधे लिहिलं आहे. ती म्हणते, आईचं लक्ष आपल्या मुलांच्या अभ्यासा इतकंच मुलांच्या मनावरही असलं पाहिजे. आईनं मुलांच्या मनातल्या विचारांच्या कोवळ्या पात्यांची दखल घ्यायला हवी. मुलं त्यांच्या मनातलं सांगणार नाही पटकन पण आईनं अनेक प्रश्न विचारुन मुलांच्या मनाचा ठाव घ्यायचा असतो. मुलांच्या जगात आणि मनात शिरुन त्यांना जाणून घेणं, तिथं काही विस्कळित आढळलं, ते कुठेतरी भरकटलेले आढळले तर त्यांची मदत करुन त्यांना मूळ जागेवर आणणं गरजेचं असतं. एका आईनं हे रोज करणं अपेक्षित आहे. तरच ती परफेक्ट मदर होऊ शकते.’

Image: Google

ट्विंकल म्हणते , की मी मात्र या परफेकशन पासून खूप दूर आहे. मला सतत एका गोष्टीचं अपराधीपण वाटत असतं. ‘आपण आपल्या मुलांची चांगली आई नाही’, ही अपराधी भावना आई जमातीतल्या अनेकींच्या मनात असते, तशी ती माझ्याही मनात आहे. आपण आपल्या मुलांची चांगली आई होणं हे खरंतर मुलांसाठी पुरेसं आहे आणि चांगली आई होणं ही आपली मुख्य गरज आहे.

मुलांचा अभ्यास, त्यांच्या भौतिक गरजा , आजारपणं याकडे लक्ष देऊन आपण परिपूर्ण आई होत नाही. त्यासाठी मुलांचं मन वाचणं , त्यांचं मन समजून घेणं जमायला हवं. आपल्यासह अनेक आया इथेच कमी पडतात हे ट्विंकलनं आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं. तिच्या या पोस्टला बॉलिवूडमधील दिया मिर्झा, मलायका अरोरा, ताहिरा कश्यप या आयांनीही सकारात्मक दाद दिली आहे. तर तिच्या फॉलोअर्सनी, चाहत्यांनी ‘मॅडम, तुम्ही हा अतिशय चांगला विचार मांडला, मुलांशी अशा पध्दतीने जोडलं जाणं गरजेचं आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तर एकानं आपल्याला तुमचा विचार पटला हे सांगतानाच माझ्या आईला हा विचार ऐकवणं आणि तिला तो पटवून देणं खूप गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

Image: Google

ट्विंकल खन्ना एक चांगली आई होण्याचा स्वत: तर प्रयत्न करत आहेच, पण सोबत इतर आयांनाही त्यासाठीचं विचारांचं खाद्य पुरवत आहे. आताच्या आधुनिक काळात पालकत्वाची भूमिका किती व्यापक आणि खोल झाली आहे याची तिला जाणीव आहे. आपल्या मुलांना उत्तम बालपण देणं एवढंच पालकत्त्व नाही. तर मुलांच्या मनात सतत नवनवीन कल्पना भरत राहाणं, त्यांना त्यांच्यातील क्षमतांची जाणीव करुन देणं म्हणजे सुदृढ पालकत्त्व. पालक म्हणून सतत मुलांच्या चुका आणि दोष दाखवत राहाणं हे ट्ट्विंकलला एक पालक म्हणून मान्य नाही. मुलांवर वेड्यासारखं प्रेम करणं आणि सोबत्च त्यांच्या चांगल्यासाठी त्यांना न आवडणार्‍या भाज्या तितक्याच जबाबदारीनं त्यांच्या घशात कोंबणं या दोन टोकाच्या भूमिका सुदृढ पालकत्त्वाची भूमिका निभावताना घ्यावीच लागते. असं ट्विंकल सांगते. आई झाल्यानंतर, पालक म्हणून मुलांसोबत असताना आपल्याला आपल्या विचारांचा आणि जाणिवांचा भाग मुलांची काळजी, परीक्षांमधला त्यांचा बॅड परफॉर्मंन्स, त्यांना टोचणार्‍या वेदना समजून घेण्यात, त्यांना समजावून सांगण्यात घालाव्याच लागणार आहे. हे आपल्याला प्रत्येक दिवशी, रोज, न थांबता करावं लागणार आहे. अर्थात इतर सर्व गोष्टींवर नीट लक्ष ठेवून , त्याबाबतच्या आपल्या नेहमीच्या जबाबदार्‍या पार पाडून परिपूर्ण आई आणि उत्तम पालक होण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 

कोणत्याही आईला आपल्या मुलांची परिपूर्ण आई होण्याची इच्छा असते. कोणी त्यासाठी प्रयत्न करतं, तर कोणाला त्यासाठी काय करावं हेच उमजत नाही. पण ट्विंकल खन्नानं स्वत:चा अनुभव आणि भावना व्यक्त करुन एक दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Twinkle Khanna wants to be a good and perfect mother...She urged every mother try to be good mother by reading their kid's mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.