Join us

"मी मुलाला पासवर्ड विचारला आणि मला धक्काच बसला कारण....." ट्विंकल खन्ना सांगते, मुलगा २१ वर्षांचा झाला आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2023 13:30 IST

Parenting Tips By Twinkle Khanna: पासवर्ड मागितल्यावर माझा २१ वर्षांचा मुलगा आरव याने जे काही उत्तर दिलं, ते ऐकून मला धक्काच बसला, असं सांगतेय अभिनेत्री ट्विंकल खन्ना....

ठळक मुद्देमुलाने दिलेलं हे उत्तर ऐकून ट्विंकलला जरा धक्काच बसला. ती खूपच नाराज झाली. मुलगा आपल्यापासून दुरावतोय अशी फिलिंग येऊ लागली.

अभिनेत्री, इंटेरियर डेकोरेटर, लेखिका असं बरंच काही असणारी ट्विंकल खन्ना तिच्या आयुष्यातले अनेक किस्से सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. ट्विंकल सध्या टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपमध्ये एक कॉलम लिहीते. या कॉलम मध्ये तिने तिच्या २१ वर्षाचा मुलगा आरव याचा एक किस्सा सांगितला आहे. ज्यांची कोणाची मुलं वयात येणारी आहेत, त्यांच्यासाठी हा किस्सा खरोखरच विचार करायला लावणारा आहे. (Twinkle Khanna was offended when son Aarav refused to share his password with her)

 

ट्विंकल म्हणते की काही दिवसांपूर्वी कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्सच्या निमित्ताने तिला मुलगा आरव आणि ११ वर्षांची मुलगी नतारा यांच्याबद्दलची काही माहिती इन्शुरन्स कंपनीला द्यायची होती. तिने मुलीची तर सगळी माहिती दिली.

काय भलतंच! ‘तिने’ चक्क कब्रस्तानात केलं मॅटर्निटी फोटोशूट; पण तिने ‘असं’ का केलं असेल?

पण मुलाची माहिती देण्यासाठी तिला त्याच्या काही अकाउंट्सच्या पासवर्डची गरज होती. म्हणून तिने मुलाला पासवर्ड मागितला. पण त्यावर मुलाने तिला रोखठोक उत्तर दिले. तो म्हणाला की आई मला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आवडेल. पण मी माझे पासवर्ड तुझ्यासोबत शेअर करू शकत नाही. कारण आता मी २१ वर्षांचा आहे १२ वर्षांचा नाही....

 

मुलाने दिलेलं हे उत्तर ऐकून ट्विंकलला जरा धक्काच बसला. ती खूपच नाराज झाली. मुलगा आपल्यापासून दुरावतोय अशी फिलिंग येऊ लागली.

तुम्ही पाणी कमी पित आहात हे सांगणारी ५ लक्षणं, बघा तुम्हालाही असा त्रास होतोय का?

हा किस्सा तिने तिची आई अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना सांगितला तेव्हा डिंपल तिला म्हणाल्या की तिचा मुलगा काहीही वेगळं करत नाहीये. ट्विंकल या वयात होती तेव्हा तिनेही असंच केलं होतं. त्यामुळे आता वयाच्या या टप्प्यावर तू मुलाची आई होऊन त्याला धाक दाखवण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री कर आणि त्याची मैत्रीण होऊन त्याला समजून घे... यानंतर कुठे ट्विंकलची नाराजी थोडी थोडी कमी होऊ लागली आणि ती मुलाशी जुळवून घेण्याचा, त्याला समजून घेण्याचा पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करू लागली आहे म्हणे..... 

टॅग्स :पालकत्वट्विंकल खन्नाडिम्पल कपाडिया