Join us

अमेरिकन महिला मुलं घेऊन आली भारतात, म्हणाली मुलांचं बालपण भारतातच जायला हवं कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 14:51 IST

US Woman Kristen Fischer Prefers Raising Her Children In India: क्रिस्टेन मुळची अमेरिकेची. पण मुलांचं बालपण भारतातच जावं असं तिला मनापासून वाटलं आणि म्हणून ती तिथून निघून थेट दिल्लीत येऊन स्थायिक झाली.. तिला नेमकं इथलं काय आवडलं असावं बरं?

ठळक मुद्देक्रिस्टेन काही वर्षांपुर्वी दिल्लीला आली आणि भारताच्या प्रेमातच पडली. आता तिला मुलं झाली असली तरी तिला त्यांना अमेरिकेत घेऊन जायचं नाहीये.

आज आपली तरुण मंडळी स्वत:च्या आणि मुलांच्या उत्तम भवितव्यासाठी परदेशात आणि विशेषत: अमेरिकेत स्थायिक होत  आहे. करिअरच्या तिथे खूप चांगल्या संधी आहेत, शिवाय पैसाही इथल्यापेक्षा जास्त मिळतो म्हणून तरुण मंडळी तिकडे जातात. लग्न झाल्यानंतर तिथलं नागरिकत्व मुलांना मिळावं म्हणून तिथेच मुलांचा जन्म होऊ देतात. जेणेकरून मुलांना तिथल्या उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा मिळू शकतील.. असं सध्याचं आपल्याकडचं चित्र असलं तरी काही मुळच्या अमेरिकन लोकांना मात्र भारताचं आकर्षण आहे. त्यातलीच एक आहे क्रिस्टेन. क्रिस्टेन काही वर्षांपुर्वी दिल्लीला आली आणि भारताच्या प्रेमातच पडली. आता तिला मुलं झाली असली तरी तिला त्यांना अमेरिकेत घेऊन जायचं नाहीये. तिला वाटतं की तिच्या मुलांचं बालपण इथे भारतातच गेलं पाहिजे..(US Woman Kristen Fischer Lists 8 Reasons Why She Prefers Raising Her Children In India)

 

मुलांचं बालपण भारतात जावं असं क्रिस्टेनला का वाटतं?

क्रिस्टेनने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते की भारतात खऱ्या अर्थाने माझी मुलं त्यांच्या बालपणाचा आनंद घेत आहेत. इथे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अमेरिकेत मिळू शकत नाहीत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया..

नेहमीच थकल्यासारखं होतं- गळून गेल्यासारखं वाटतं? तुम्हाला असू शकतो ५ आजारांचा धोका

१. क्रिस्टेनच्या मते भारतात संस्कृती, भाषा, परंपरा या बाबतीत खूप वैविध्य आहे. माझ्या मुलांना लहानपणीच हे सगळं अनुभवायला मिळाल्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा समजून घ्यायला, त्यांचा आदर करायला आणि त्या स्विकारायला ते शिकत आहेत.

२. इथे खूप भाषा बोलल्या जातात. माझ्या मुलांना हिंदी येतं आणि इतरही अनेक भाषा त्यांच्या कानावर पडतात. यामुळे त्याचं संवाद कौशल्य, आकलन क्षमता वाढते. याचा नक्कीच त्यांना भविष्यात उपयोग होईल.

३. इथे राहिल्यामुळे त्यांना जगाकडे बघण्याचा एक नवा आणि विस्तृत दृष्टीकोन मिळत आहेत. इथल्या स्थानिक अडचणींपासून ते जागतिक दर्जाच्या प्रश्नांपर्यंत अनेक गोष्टींचे अनुभव त्यांना मिळतात. 

 

४. कोणत्याही नव्या देशात स्थायिक व्हायचं असेल तर मुलांना कित्येक आव्हानांना सामोरं जावं लागतं. माझ्या मुलांच्या बाबतीतही ते होत आहे. त्यातून त्यांच्यामध्ये धाडस, स्वावलंबन, कोणताही प्रश्न तडीस नेण्याची क्षमता वाढते आहे. 

५. कौटुंबिक स्तरावर असणारी विविधता समजून घेताना मुलांमध्ये Emotional Intelligence ही वाढतो आहे.

शर्टची मळालेली कॉलर १ मिनिटांत होईल चकाचक- तुरटीचा छोटा तुकडा घेऊन करा 'हा' उपाय

६. इथली कुटूंब व्यवस्था, नातीगाेती हे सगळं पाहून मुलांना कुटूंब म्हणजे काय ते कळतं, आपल्या लोकांशी असणारं भावनिक नातं आणखी घट्ट हाेत जातं.

७. जिथे आर्थिक स्तरावरही खूप भिन्नता दिसून येते तिथे मुलं आपोआपच साधं राहणं, पैशाची किंमत करणं, आपल्याला जे मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहाणं शिकतात.

८. इथे राहून माझ्या मुलांनी खूप वेगवेगळ्या लोकांशी मैत्री केली असून त्यातून त्यांचं स्वत:चं ग्लोबल नेटवर्क तयार झालं आहे..  

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंशिक्षणअमेरिकाभारत