Join us  

मुलांचं वय वाढतंय पण उंचीच वाढत नाही? ५ पदार्थ खायला द्या- उंची वाढेल, ताकदही येईल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 1:50 PM

Useful Tips To Increase Kids Height So Fast : मूल अगदी लहान असल्यापासूनच त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिल्यास उंची चांगली वाढण्यास मदत होते.

मुलांच्या वयानुसार त्यांची उंची फारच कमी दिसते असं अनेकदा दिसून येतं. अनेक घरांमधील पालक आपल्या मुलांच्या उंचीबाबत चिंतेत असतात. (Parenting Tips) काही सोपे उपाय करून तुम्ही मुलांची  उंची सहज वाढवू शकता. रोजच्या आहारात ५ पदार्थांचा समावेश केल्यास मुलांची उंची चांगली वाढेल त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. मूल अगदी लहान असल्यापासूनच त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष दिल्यास उंची चांगली वाढण्यास मदत होते. (Tips To Increase Kids Height Fast And Naturally)

डॉक्टर युकसेल युरटस यांच्यामते मुलं आणि मुली दोघांसाठी हाडांमधील वाढीच्या प्लेट्स बंद होईपर्यंत उंचीची वाढ सुरू असते. जी तारूण्य संपेपर्यंत असते. मुलांना  साधारणपणे १४ ते १६ या वयोगटात आणि मुलांना १६ ते १८ या वयोगटात वाढीत्या प्लेट्स दिसतात (Ref). अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये हा कालावधी मुलांमध्ये  २० वर्षांपर्यंत वाढू शकतो. चांगला संतुलित आहार घेऊन तुम्ही आपली तब्येत चांगली ठेवू शकता. प्रोटीन्स कॅल्शियम, व्हिटामीनमुळे शरीराला चांगले न्युट्रिएंट्स मिळतात.

आहारात  फ्रुट्स, व्हेजिटेबल, लिन मिट्स आणि डेअरी प्रोडक्ट्सचा समावेश करा. धावणं, उड्या मारणं, सायकलिंग या व्यायाम प्रकारांमुळे फक्त फिटनेस चांगला राहत नाही तर ओव्हरऑल  शरीर चांगले राहते.  या व्यायाम प्रकारांमुळे बोन्स डेंसिटी वाढते ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होते.  रात्रीची झोप मुलांच्या वाढीसाठी फार महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा शरीर ग्रोथ हॉर्मोन रिलिज  करते. 

1) संतुलित आहार घ्या

संतुलित आहार मुलांच्या विकासासाठी फार महत्वाचा असतो उंची वाढवण्यासाठी मुलाना प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटामीन डी आणि इतर पोषक तत्वांची आवश्यकता असते.  डाळी, पनीर, दूध, हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता.  विशेष म्हणजे सकाळच्या सुर्यप्रकाशात काहीवेळ चाला  ज्यामुळे शरीराला व्हिटामीन डी मिळेल. 

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

2) नियमित व्यायाम

नियमित व्यायाम मुलांच्या शारीरिक विकासासाठी फार महत्वाचा असतो. उड्या मारणं,  धावणं, योगा आणि अन्य शारीरिक एक्टिव्हीटीज केल्यानं मुलांची उंची वाढण्यास मदत होते. 

3) पुरेशी झोप

योग्य प्रमाणात झोप घेणं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी फार महत्वाचे असते. झोपेमुळे शरीराच्या विकास हॉर्मोन्सचं उत्पादनं होते. ज्यामुळे उंची वाढण्यास मदत होते. रात्रीच्यावेळी मुलांना फोन किंवा टिव्ही जास्तवेळ पाहत असतील तर त्यांच्या झोपेवर परिणाम होतो. योग्य प्रमाणात झोप घेणं मुलांसाठी फार महत्वाचे असते. झोपेदरम्यान शरीर विकास हॉर्मोन्सचे उत्पादन करते ज्यामुळे उंची वाढवण्यास मदत होते. 

रोज विंचरताना केस भरपूर गळतात? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय; महिन्याभरात दाट होतील केस

डॉक्टरांचा सल्ला घ्या

तुम्हाला असं वाटत असेल की मुलांची उंची वयानुसार खूपच कमी आहे तर वेळीच बाल रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मुलांची उंची वाढवण्यासाठी तुम्ही काही चाचण्या करून नंतर उपचार सुरू करू शकता. मुलांच्या विकासाचा दर वेगवेगळा असतो, यासाठी  मुलं इतर मुलांपेक्षा उंचीला लहान असेल तर घाबरू नका. संतुलित आहार, नियमित व्यायाम, योग्य प्रमाणात झोप आणि ताण-तणावमुक्त वातावरण उंची वाढवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं