प्रत्येक पालकांसाठी त्यांची मुलं खास असतात (Parenting Tips). लहान असल्यापासून ते तारुण्यात पदार्पण करण्यापर्यंत मुलं आपल्या पालकांवर पूर्णपणे अवलंबून असतात (Child Care). पण जस जसे मुलं मोठे होतात. तस तसे त्यांचे पालकांपासून अंतर वाढत जाते. पालक आपल्या मुलांशी असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतात.
परंतु, मुलांशी संवाद नसल्यामुळे त्यांच्यातला दुरावा वाढत जातो. शिवाय वर्किंग पॅरेण्टस असल्यामुळे त्यांना मुलांसोबत वेळ घालवायला मिळत नाही. मुलांसोबत दिवसभर जरी वेळ घालवायला मिळत नसला तरी, आपण दिवसातील ही ९ मिनिटे मुलांसोबत नक्कीच घालवू शकता.
पावसाळ्यात मुलं अंथरुण ओलं करतात? ५ टिप्स, डॉक्टर सांगतात त्रास कमी करायचा तर..
याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन मांडविया यांनी दिली आहे. यामुळे पालक आपल्या मुलांच्या जीवनात सकारात्मकता पसरवू शकतील. शिवाय पालक आणि मुलांमधील बॉण्ड अधिक घट्ट राहण्यास मदत होईल(Using the 9-minute theory to satisfy your child's needs).
दिवसातील कोणती ९ मिनिटे पालकांनी मुलांसोबत घालवावे?
सकाळी उठल्यानंतर मुलांशी ३ मिनिटे बोला
सकाळी उठल्यानंतर मुलांसोबत ३ मिनिटे बोला. कोणत्याही विषयवार आपण त्यांच्याशी बोलू शकता. मुलांच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी हे आवश्यक आहे. असे केल्याने मुलांची तुमच्याप्रती असलेली ओढ वाढत जाईल. शिवाय दिवसाची सकारात्मकतेने होईल.
शाळेतून किंवा डे केअरमधून घरी आल्यानंतर ३ मिनिटे बोला
शाळेतून किंवा डे केअरमधून घरी परत आल्यानंतर मुलांसोबत ३ मिनिटे बोला. त्यांचा शाळेत दिवस कसा गेला? नवीन काय शिकायला मिळालं? असे काही प्रश्न आपण त्यांना विचारू शकता. यामुळे तुमच्यामधलं बॉण्ड अधिक घट्ट होईल.
वारंवार सांगूनही मुलं ऐकत नाहीत, उद्धटासारखं वागतात? ५ चुका टाळा; मुलं शहाण्यासारखं वागतील
झोपण्यापूर्वी मुलांशी ३ मिनिटे बोला
झोपण्यापूर्वी मुलासोबत ३ मिनिटे बोला. रात्री त्यांना एखादी गोष्ट सांगा यामुळे त्यांच्यासोबत संवाद वाढेल. यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडेल. शिवाय मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल.
दिवसातील ही ९ मिनिटे प्रत्येक मुलासाठी खूप महत्त्वाची असतात, त्यामुळे प्रत्येक पालकाने हा वेळ आपल्या मुलांना देणे आवश्यक आहे.