Lokmat Sakhi >Parenting > आईबाबाच मुलांना डरपोक बनवतात, आत्मविश्वासच हरवतो त्यांचा!पाहा ३ चुका, पालक रोज करतात...

आईबाबाच मुलांना डरपोक बनवतात, आत्मविश्वासच हरवतो त्यांचा!पाहा ३ चुका, पालक रोज करतात...

Simple ways you can help your child overcome their fears Anxiety : मुलांच्या मनातील भीती दूर करुन मोकळेपणाने जगायला शिकवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 06:42 PM2024-08-30T18:42:58+5:302024-08-30T18:57:04+5:30

Simple ways you can help your child overcome their fears Anxiety : मुलांच्या मनातील भीती दूर करुन मोकळेपणाने जगायला शिकवा..

ways you can help your child overcome their fears Anxiety and fear in children | आईबाबाच मुलांना डरपोक बनवतात, आत्मविश्वासच हरवतो त्यांचा!पाहा ३ चुका, पालक रोज करतात...

आईबाबाच मुलांना डरपोक बनवतात, आत्मविश्वासच हरवतो त्यांचा!पाहा ३ चुका, पालक रोज करतात...

'भीती' हा दोन अक्षरी शब्द जितका लहान तितकाच त्याचा अर्थ खोल आणि गंभीर आहे. भीती कुणालाही वाटू शकते. अगदी लहान बाळांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्याच मनात एक प्रकारची 'भीती' लपलेली असते. आपल्या मनात अनेक भावना असतात त्यापैकीच 'भीती' ही देखील एक प्रकारची भावना आहे. कुणाला कशाची कधी भीती वाटेल हे सांगता येत नाही. आपण आपल्या घरातील लहान मुलांच्या मनात कळत - नकळतपणे अनेक प्रकारची भीती भरुन देत असतो.

मुलं लहान असताना हे करु नकोस, झोप नाहीतर बागुलबुवा येईल, जेवला नाहीस तर असं होईल असे अनेक संवाद आपल्या सगळ्यांच्या घरात फार कॉमन आहेत. आपले मुलं लहान असताना त्याला बागुलबुवाची भीती दाखवण्यापासून ते मोठं झाल्यावर 'अरे तू किती घाबरट' असे सतत बोलून आपणच पालक मुलांच्या आयुष्यात सतत नकारात्मकता आणि भीती घालून देत असतो. मुलांना धीट बनवायचे आहे असे म्हणून आपणच आई वडील मुलांच्या मनात भीतीच घर करून देतो(Simple ways you can help your child overcome their fears Anxiety).

युट्युबवरील 'द देबीना बॅनर्जी शो' मध्ये कोच सलोनी सूरी यांनी मुलांच्या मनातील भीती कशी कमी करावी, तसेच मुलांच्या मनात सकारात्मकता कशी वाढेल याबद्दल अधिक माहिती दिली आहे. या व्हिडिओत सांगितले आहे की, लहान मुलांच्या मनात अनेकदा खूप गोष्टींची भीती असते. मुलांना भीती वाटण्याची कारण खूप वेगवेगळी असू शकतात. काहीवेळा मुलांना ज्या गोष्टीची भीती वाटते त्यावर अनेक पालक हसतात, तर काही रागावतात.

मुलांची ही भीती अतिशय शुल्लक देखील असू शकते. जसे की समजा, मुलांच्या हातात आपण काचेचा ग्लास दिला आणि तो त्याला पकडायला लावला. आपल्या पाल्याने तो काचेचा ग्लास हातात धरला देखील. परंतु नंतर आपण पालक सतत मुलांना सांगत राहतो, तो काचेचा ग्लास आहे नीट पकड, ग्लास हातात नीट पकड नाहीतर तो हातातुन पडेल, ग्लास हातातून पडला तर तो फुटेल. अशा एक ना अनेक प्रकारे आपण मुलांच्या मनांत सतत भीती निर्माण होईल असे वातावरण तयार करत असतो. मग नक्की पालकांनी वागावे कसे ? असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर अशावेळी आपण मुलांना सांगू शकतो. तो ग्लास मी तुला हातात पकडण्यासाठी दिला आहे. तो ग्लास तू तुझ्या हातांनी घट्ट धरुन ठेव म्हणजे तो ग्लास तुझ्या हातात व्यवस्थित पकडला जाईल, असे सकारात्मक पद्धतीने आपण मुलांना समजावू शकता. यामुळे मुलानांच्या मनात सकारात्मक भावना वाढून भीती वाटण्याचे प्रमाण कमी होईल. 

झोपलेल्या बाळाच्या अंगावर आईबाबा पांघरुण घालतात पण ते मुलं ते फेकतात, कारण माहिती आहे?

लहान मुलांच्या मनातील भीती कशी काढून टाकावी ? 

आपल्या मुलांच्या मनातील कोणत्याही गोष्टींची भीती काढण्यापूर्वी, पालकांनी त्यांना कशाची भीती वाटते हे समजून घेणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच तुमच्या मुलांना समजावून सांगा की तुम्ही सुरक्षित आहात, आणि तुम्ही त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्यासोबत आहात. मुलं थोडे मोठे झाल्यावर त्याच्याशी बोला आणि त्याचे म्हणणे देखील ऐका. मुलांना त्याच्या मनातील भीतीची भावना शब्दांत व्यक्त करायला शिकवा. जेव्हा तुमच्या मुलाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा त्याची चेष्टा करु नका. यामुळे तुमच्या मुलांच्या मनात निराशा निर्माण होते आणि त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. मुलांना कशाचीही भीती वाटत असली तरीही त्यांना ती गोष्ट पुन्हा करायला लावू नका, त्यांच्या मनातील भीती दूर होण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे त्याला पुरेसा वेळ द्या आणि अनावश्यक दबाव टाकू नका.

Web Title: ways you can help your child overcome their fears Anxiety and fear in children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.