Lokmat Sakhi >Parenting > लहान मुलांना कोरोना झाला तर काय लक्षणं दिसतात? दवाखान्यात ॲडमिट करावंच लागतं का?

लहान मुलांना कोरोना झाला तर काय लक्षणं दिसतात? दवाखान्यात ॲडमिट करावंच लागतं का?

लहान मुलांना अगदी नवजात शिशूंनाही कोरोना होऊ शकतो का, झालाच तर उपचार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 04:35 PM2021-09-01T16:35:58+5:302021-09-01T16:39:33+5:30

लहान मुलांना अगदी नवजात शिशूंनाही कोरोना होऊ शकतो का, झालाच तर उपचार काय?

What are the symptoms of corona in children? hospitalization necessary? | लहान मुलांना कोरोना झाला तर काय लक्षणं दिसतात? दवाखान्यात ॲडमिट करावंच लागतं का?

लहान मुलांना कोरोना झाला तर काय लक्षणं दिसतात? दवाखान्यात ॲडमिट करावंच लागतं का?

Highlightsकोरोना काळात लहान बाळ असलेल्या प्रत्येक घरात कमीत कमी व्यक्तींनी बालकाला हाताळावे. सर्वांनी मुखपट्टी वापरावी

डॉ. राकेश लोढा, डॉ. एस के काबरा

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण खूप कमी आहे हे खरं असलं तरी त्यांना संसर्ग होतच नाही असं नाही. किती मुलांना कोरोना झाला याचा डेटा उपलब्ध नाही. अन्य संसर्गजन्य श्वसनाच्या आजारापेक्षा लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यतां कमी असते. कोरोना संसर्ग झालेल्या बालकांपैकी बहुतांश मुलांना घरातील मोठ्या व्यक्तींकडून लागण होते. घरातील मोठ्यांच्या विलगीकरण केल्यास मुलांना लागण होण्याची शक्यता कमी होते. मुलांची प्रतिकारशक्ती सक्रीय असल्याने त्यांना लागण होण्याचं प्रमाण कमी असतं आणि मुलांमध्ये मधुमेह, धूम्रपान यांसारखे आजार किंवा घातक सवयी असण्याची शक्यता कमी असल्यामुळेही त्याची कोरोना लक्षणं तीव्र होत नाहीत किंवा त्याना मृत्यूचा धोका नसतो.
लहान मुलांना कोरोनाची लागण झालीच तर श्वसनाचा तीव्र आजार किंवा मल्टी सिस्टम इंफेंटरी सिंड्रोमची लक्षण दिसतात. 


 

लहान मुलांना लागण होण्याची तीन प्रमुख कारणं आहेत.

१. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा संपर्क,२ विषाणू असलेल्या थेंबांचा संपर्क, ३ हवेतून होणारा संसर्ग यापैकी संसर्गित व्यक्तीचा संपर्क हेच महत्वाचं कारण आहे. 
ते रोखण्यासाठी संसर्गित व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क टाळावा, पृष्ठभाग स्वच्छ ठेवावे , प्रत्यक्ष शारीरिक संपर्क होण्यामध्ये अडसर तयार करावे, शारीरिक अंतर राखावे, मुलांच्या सानिध्यात असताना मुखपट्टीचा वापर करावा. श्वसनातून संसर्ग होऊ नये यासाठी घरात हवा खेळती राहील हे पाहावे, हवा शुद्धीकरण करावं, घराच्या आत असताना गर्दी करू नये, बंदिस्त ठिकाणी मुखपट्टी वापरावी. मुखपट्ट्या चांगल्या प्रतीच्या आणि चेहऱ्यावर व्यवस्थित बसणाऱ्या असाव्यात.
कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून मुलामध्ये लक्षणं दिसण्यापूर्वीच्या काळात संसर्गित मुलाकडून इतरांना लागण होण्याची शक्यता असते. कोणतीही लक्षणं नसताना कुटुंबातील व्यक्ती पॉझिटीव्ह आल्यावर कुटुंबियांची तपासणी केल्यावर कोणतीही दृश्य लक्षणं नसताना कोरोना चाचणी केल्यावर मुलंही पॉझिटीव्ह असल्याचं आढळलं. काही मुलांना ताप, खोकला,सर्दी, घसा बसणे, दम लागणे अशी लक्षणं दिसून आली तर ५-१० टक्के मुलांमध्ये श्वसनाला त्रास झाला नाही मात्र पोट खराब होणे, उलट्या जुलाब होणे, मल्टी सिस्टम इंफ्लमेटरी सिंड्रोम अशी वेगळी लक्षणंही आढळून आली.
मुलांना साधारणपणे सौम्य लक्षणं असेलेला संसर्ग होत असल्यामुळे त्यांना घरीच विलगीकरण करून उपचार केले जावेत. मूल रडत नसेल तेव्हा दिवसातून दोन – तीनदा त्यांचा ताप, श्वासोच्छवास, हृदयाचे ठोके याच्या नियमित नोंदी ठेवाव्यात. त्यांना पुरेशी विश्रांती घेऊ द्यावी. पुरेसं अन्न भरवावं आणि पाणी पाजावं. वय आणि वजनानुसार पॅरासिटामोल द्यावी आणि धोक्याची लक्षणं दिसताच डॉक्टरांना दाखवावं. त्यांचा श्वासोच्छवास, सर्दी, शरीराचा रंग, लघवी यावर लक्ष ठेवावे, ऑक्सिमीटरच्या मदतीने ऑक्सिजन पातळी तपासावी. डॉक्टरांच्या संपर्कात राहावं
पण श्वासोच्छवासाला खूप त्रास होत असेल, हालचाली कमी झाल्या असतील, मूल अन्न घेत नसेल, आकडी येत असेल तर ताबडतोब रुग्णालयात भरती करावं.
रुग्णालयातल्या नवजात मुलांची प्रत्यक्ष तपासणी, त्यांना भरती करणं, स्तनपान, कुटुंबियांची भेट, संवाद आणि समुपदेशन हे आव्हान ठरतं. तसंच पालकांसाठी डॉक्टर आणि रुग्णालयात जाणं, पालक आणि नवजात बालकांचा लळा, दिनक्रमात कुटुंबियांचा सहभाग, लसीकरणात खंड पडणं यामुळे तणाव वाढतो.
मूल आणि आई दोघांची तब्येत स्थिर असेल तर दोघांना एकत्र ठेवावं. प्रत्यक्ष स्तनपान किंवा आईचं दूध काढून मुलाला देण्यात यावं. प्रत्यक्ष संपर्काची काळजी घेऊन मातेच्या सान्नीध्यात मुलाची काळजी घेतली जावी. आईने सातत्याने हाताची स्वच्छता राखावी. स्तनपान करण्यापूर्वी आणि मुलाला स्पर्श करण्यापूर्वी दरवेळी हात धुवावेत. मुखपट्टी वापरावी आणि आसपासचे सर्व पृष्ठभाग स्वच्छ करावेत. बाळाला घेऊन प्रवास करतानाही कोविड सुसंगत वर्तन करून संसर्ग टाळावा. त्यांचे नियमित लसीकरण करावे आणि कुटुंबातील एक निरोगी व्यक्ती देखभालीला मदत करण्यासाठी बरोबर असू द्यावी. इतर कुटुंबियांना त्यांनी पाळायची बंधन, नियम समजावून सांगावेत. संपर्क, उपचार यासाठी शक्यतो फोन आणि व्हिडियो कॉल वर संपर्क साधावा.
मुलाचं आरोग्य सुधारलं की रुग्णालयातून ताबडतोब घरी परतावं. घरातही बाळाला इतरानी हाताळू नये आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळले जावे. कोरोना काळात लहान बाळ असलेल्या प्रत्येक घरात खालील गोष्टी पाळल्या जाव्या.
कमीत कमी व्यक्तींनी बालकाला हाताळावे.
सर्वांनी मुखपट्टी वापरावी
शारीरक अंतर राखावं
खोकताना, शिंकताना काळजी घ्यावी
वारंवार हात धुवावे.
घर स्वच्छ ठेवावे.


-(‘कोविड सुसंगत वर्तन उत्तेजन आणि लस संकोच निर्मुलन’ डीएलए फाउंडेशन आणि युनिसेफचा संयुक्त उपक्रम)

Web Title: What are the symptoms of corona in children? hospitalization necessary?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.