Join us  

सरोगसी म्हणजे काय? सरोगसीद्वारे पालक होण्यासंदर्भात नियम काय सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 2:44 PM

Parenting Tips Surrogacy सेलिब्रिटींसंदर्भात सरोगसी मातृत्व असा शब्द आपण ऐकतो, मात्र त्यासंदर्भात कायदा काय सांगतो?

महिलांसाठी मातृत्व हे आनंदायी आणि सुखद देणारं क्षण असतो. एक महिला जेव्हा आई होत असते. तेव्हा ती स्वतःची खूप काळजी घेत असते. मात्र, एखाद्या दाम्पत्याला बाळ होत नाही तेव्हा अनेक जोडपे सरोगसीचा मार्ग स्वीकारतात. बॉलीवूड सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी सरोगसीद्वारे आई बनण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यात बॉलिवूड व हॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा, सनी लिओनी, गौरी खान, अश्या व अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.  सरोगसी निगडीत अनेक नियमदेखील पालकांना पाळावे लागते. ज्यात जानेवारी २०२२ पासून देशात कमर्शिअल सरोगसी बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे.

सरोगसी म्हणजे काय?

एखाद्या दाम्पत्याला जर मूल होत नसेल तर ते दुसऱ्या महिलेच्या उदरात त्यांचे मूल वाढवू शकतात. ज्या जोडप्याला बाळ हवं आहे, त्या जोडप्यामधील पुरुषाचे शुक्राणू घेऊन प्रयोगशाळेत वैद्यकीय प्रक्रियेद्वारे गर्भ तयार केला जातो. तो गर्भ एका वैद्यकिय प्रक्रियेद्वारे एका महिलेच्या गर्भामध्ये ठेवला जातो. ज्या महिलेच्या गर्भात हे बाळ वाढते, त्या महिलेला 'सरोगेट मदर' असं म्हटलं जातं.बाळाचा जन्म झाल्यावर, करारानुसार, ते मूल जैविक पालकांकडे सोपवलं जातं.

सरोगसी हे दोन प्रकारचे असतात

पारंपारिक सरोगसी

गर्भावस्थेतील सरोगसीचे दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकाराला अल्ट्रास्ट्रिक सरोगसी असे म्हटले जाते जेव्हा जोडपे एखाद्या सरोगेट महिलेला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देतात आणि सर्व खर्च त्यांच्याकडून केला जातो.

गर्भधारणा सरोगसी

गर्भधारणेच्या सरोगसीमध्ये, सरोगेट आईचा मुलाशी कोणताही अनुवांशिक संबंध नसतो. या सरोगसीमध्ये सरोगेट आईची अंडी वापरली जात नाहीत आणि ती मुलाला जन्म देते. यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी (IVF तंत्र) द्वारे पालकांचे शुक्राणू आणि अंडी जुळल्यानंतर सरोगेट मातेच्या गर्भाशयात त्याचे रोपण केले जाते.

सरोगसीचा नवा नियम काय सांगतो

सरोगसी नियमन कायदा २०२१ नुसार व्यावसायिक सरोगसीला बंदी घालण्यात आली आहे. २५ डिसेंबर २०२१ रोजी संसदेने विधेयक मंजूर केले. राष्ट्रपतींनी २५ जानेवारी २०२२ रोजी या कायद्याला मान्यता दिली. या कायद्या अंतर्गत व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली होती, केवळ परोपकारी सरोगसीला परवानगी होती. ‘परोपकारी सरोगसी’ म्हणजे ज्यामध्ये सरोगेट आई पैसे घेणार नाही, फक्त तिला याचा वैद्यकीय खर्च आणि जीवन विमा द्यावा लागतो. नातेवाईकांमधील महिला, मैत्रिणी या सरोगेट मदर होऊ शकतात.

टॅग्स :पालकत्वप्रेग्नंसी