Lokmat Sakhi >Parenting > मुलांच्या पोटात जंत झाले हे कसं ओळखायचं? डॉक्टर सांगतात ५ टिप्स, मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसली तर....

मुलांच्या पोटात जंत झाले हे कसं ओळखायचं? डॉक्टर सांगतात ५ टिप्स, मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसली तर....

What Are The Symptoms Of Stomach Worms In Kids?: मुलांच्या पोटात जंत झाले असले तरी अनेक पालकांना ते लक्षात येत नाही. म्हणूनच डॉक्टरांनी सांगितलेल्या या काही टिप्स लक्षात ठेवा...(how to identify the worms in kids stomach?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2024 02:44 PM2024-08-21T14:44:45+5:302024-08-21T14:45:24+5:30

What Are The Symptoms Of Stomach Worms In Kids?: मुलांच्या पोटात जंत झाले असले तरी अनेक पालकांना ते लक्षात येत नाही. म्हणूनच डॉक्टरांनी सांगितलेल्या या काही टिप्स लक्षात ठेवा...(how to identify the worms in kids stomach?)

What are the symptoms of stomach worms in kids? how to identify the worms in kids stomach, pet me kide ho to kya kare, remedies for stomach worms in kids | मुलांच्या पोटात जंत झाले हे कसं ओळखायचं? डॉक्टर सांगतात ५ टिप्स, मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसली तर....

मुलांच्या पोटात जंत झाले हे कसं ओळखायचं? डॉक्टर सांगतात ५ टिप्स, मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसली तर....

Highlightsसगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावर फिकट पांढरे डाग दिसू लागतात. हे लक्षण बऱ्याच पालकांना माहिती आहे. पण जंत झाले आहेत, हे सांगणारं हे एकच लक्षण नाही. 

लहान मुलांच्या पोटात जंत होण्याचं प्रमाण मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत खूप जास्त असतं. कारण लहान मुलं अस्वच्छ हाताने अनेकदा बऱ्याच गोष्टी खातात, खेळून आल्यावर हात धूत नाहीत. त्यांना नखं कुरतडण्याची सवय असते. यामुळे बरेच जंतू, धूळ, घाण पदार्थ मुलांच्या पोटात जातात. याचा परिणाम म्हणून मग त्यांच्या पोटात जंत होतात. पोटात जंत झालेली असतील तर मुलांना खाल्लेलं अन्न पचत नाही, त्यांची तब्येत सुधरत नाही आणि मग आरोग्याच्या, पाेटाच्या इतरही काही समस्या डोकं वर काढू लागतात (What are the symptoms of stomach worms in kids?). म्हणूनच मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर त्याचा वेळीच इलाज करणं अतिशय गरजेचं आहे. (how to identify the worms in kids stomach?)

 

मुलांच्या पोटात जंत आहेत हे सांगणाऱ्या ५ गोष्टी

मुलांच्या पोटात जंत झालेले आहेत, हे कसं ओळखायचं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ होमिओपॅथी डॉक्टरांनी drteenahomoeopathy या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. जंत झाल्यानंतर मुलांमध्ये दिसून येणारी लक्षणं कोणती ते पाहा...

५ पदार्थ दररोज खा- बघा भरपूर प्रोटीन देणारे सुपरफूड! रोजच्या आहारातले स्वस्त पदार्थ

१. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावर फिकट पांढरे डाग दिसू लागतात. हे लक्षण बऱ्याच पालकांना माहिती आहे. पण जंत झाले आहेत, हे सांगणारं हे एकच लक्षण नाही. 

२. दुसरं म्हणजे मुलं वारंवार पोट दुखण्याची तक्रार करतात. पोट साफ व्हायला त्यांना त्रास होतो.

 

३. जंत झाल्यानंतर मुलांंमधली चिडचिड वाढते. मुलं अचानकच खूप जास्त चिडचिड, किरकिर करायला लागले असतील तर ते सुद्धा त्यांच्या पोटात जंत असण्याचं एक लक्षण असू शकतं.

४. रात्री झोपेत असताना दात खाणं.

मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी ४ गोष्टी करा, वाचनात रमतील- भरपूर पुस्तकं वाचतील

५. अंगावर कुठेही आणि विशेषत: शी आणि शू करण्याच्या जागी वारंवार खाज येणं.. 

वरीलपैकी कोणतंही लक्षण दिसल्यास मुलांना तुम्ही जंताचं औषध कधी दिलं होतं हे आठवून पाहा आणि मागच्या ६ महिन्यांत दिलेलं नसेल तर त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना ते लगेच देऊन टाका. 


 

Web Title: What are the symptoms of stomach worms in kids? how to identify the worms in kids stomach, pet me kide ho to kya kare, remedies for stomach worms in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.