Lokmat Sakhi >Parenting > मुलांची उंची पटापट वाढावी यासाठी काय करताय? उंची वाढवण्याचे सोपे उपाय...

मुलांची उंची पटापट वाढावी यासाठी काय करताय? उंची वाढवण्याचे सोपे उपाय...

आपली उंची एका ठराविक वयापर्यंतच वाढते. एकदा विशिष्ट वयात पोहोचलो की उंची वाढत नाही, उंची वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 11:35 AM2022-05-23T11:35:46+5:302022-05-23T11:44:52+5:30

आपली उंची एका ठराविक वयापर्यंतच वाढते. एकदा विशिष्ट वयात पोहोचलो की उंची वाढत नाही, उंची वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील याविषयी...

What do you do for increasing height of children's ? Simple ways to increase height ... | मुलांची उंची पटापट वाढावी यासाठी काय करताय? उंची वाढवण्याचे सोपे उपाय...

मुलांची उंची पटापट वाढावी यासाठी काय करताय? उंची वाढवण्याचे सोपे उपाय...

Highlightsउंची ही अनुवंशिक असते हे खरे असले तरी काही प्रयत्नांनी ती वाढवता येऊ शकते....उंची वाढण्यासाठी शरीराला योग्य पोषण मिळण्याबरोबरच व्यायामाचाही सहभाग असतो

उंच व्यक्तीची नकळतच चांगली छाप पडते, त्यामुळे आपण छान उंच असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपली उंची आपल्या हातात नसून ती पूर्णपणे आपल्या आईवडिलांच्या उंचीवर अवलंबून असते असा अनेकांचा समज असतो. तर काही प्रयत्न केले तर उंची वाढवता येते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी आपला आहार, लाईफस्टाईल, व्यायाम या गोष्टी महत्त्वाच्या असतात. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांची उंची चांगली वाढली तरच ती वाढते. एकदा मुले ठराविक वयाची झाली की काही केल्या उंची वाढत नाही. आता आपण असे काही व्यायामप्रकार आणि डाएट पाहणार आहोत ज्यामुळे मुलांची उंची वाढण्यास निश्चित मदत होऊ शकते. 

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत डॉ. मिकी मेहता म्हणतात, ऑप्टीमल मूव्हमेंट थेरपी ही एक अशी थेरपी आहे ज्यामध्ये मुलांचे जॉईंटस ओपन होतात. इतकेच नाही तर त्यांचे वाढीचे हार्मोन्सची चांगली वाढ होते. शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते, हातापायातील ताकद वाढून चपळता येण्यास मदत होते. या सगळ्या गोष्टींमुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते. डॉ. मेहता उंची वाढण्यासाठी करता येतील असे काही व्यायामप्रकारही सांगतात, ते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. भिंतीकडे तोंड करुन म्हणजेच भिंतीला आपले पोट लागेल असे उभे राहा. हाताच्या बोटांनी हळूहळू वर चढल्यासारखे करा. पायाच्या टाचा उचलून चवड्यांवर उभे राहा, असेच हलूहळू खाली या. ५ ते ७ वेळा हा व्यायाम करा. यामुळे पायाचे सगळे स्नायू, मांड्या, पृष्ठभाग, पाठीचा मणका, खांदे, मान अशा सगळ्याच अवयवांना ताण पडेल आणि नकळत उंची वाढण्यासाठी त्याचा फायदा होईल.

२. पाठीचा मणका भिंतीली टेकून उभे राहा. दोन्ही पायांमध्ये खांद्याइतके अंतर घ्या. हात वर करा आणि मोठा श्वास घेऊन कंबरेतून वाकून हाताने पायाचे अंगठे धरायचा प्रयत्न करा. ५ ते ७ वेळा ही क्रिया करा. त्यामुळे शरीराचे स्नायू ओढले जाऊन उंची वाढण्यास मदत होईल.

३. खाली बसा आणि उठताना उंच उडी मारा. पुन्हा खाली बसून बाऊ्स झाल्यासारखी उंच उडी मारा. अशाप्रकारे ताण दिल्यानेही उंची वाढण्यास मदत होऊ शकते. 

४. योगामधील भुजंगासन आणि पवनमुक्तासन ही आसनेही उंची वाढण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. नियमीतपणे या आसनांचा सराव केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. 

तर प्रसिद्ध आहारतज्ज्ञ प्रियांका शेट्टी सांगतात, मुलांचे योग्य पद्धतीने पोषण होत असेल तरच त्यांची चांगली वाढ होते. त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे घटक त्यांना योग्य प्रमाणात मिळाले तर त्यांची उंची वाढण्यास मदत होऊ शकते. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांनी खाण्याच्या आधी निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या हवेत, सूर्यप्रकाशात जायला हवे. आता मुलांनी खाण्यापिण्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी ते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. मुलांना A2 गायीचे तूप आणि दूध द्यायला हवे. याबरोबरच थंडीच्या दिवसांत मुलांना आवर्जून खडीसारख द्यायला हवी. 

२. ब्रेकफास्टसाठी घरात केलेले पोहे, उपमा यांसारखे पदार्थ द्यायला हवेत. उपम्यामध्ये घरात उपलब्ध असतील त्या कोणत्याही भाज्या आपण घालू शकतो. 

३. उन्हाळ्याच्या दिवसांत मुलांना भरपूर फळे, ललिंगड, खरबूज यांसारखी पाणीदार फळे द्यायला हवीत. 

४. जेवणाबरोबर मुलांना सलाड, मूगाची डाळ, आलू पराठा किंवा भाजलेले, उकडलेले रताळे, ताक, ब्राऊन राईस, राजगिऱ्याची चिक्की किंवा तीळगुळाचा लाडू द्यायला हवे. 

५. संध्याकाळी मुलांना भूक लागते तेव्हा त्यांना शहाळ्याचे पाणी, चणे किंवा दाणे, मनुका असे काही ना काही द्यायला हवे. 

६. रात्रीच्या जेवणात मुलांना ज्वारीची भाकरी, हिरव्या पालेभाज्या, पनीर आणि भाज्यांचे सूप असे द्यायला हवे. 

७. रात्रीचे जेवण लवकर करुन मुलांनी जास्तीत जास्त तास झोपणे आवश्यक आहे. असे केल्यास मुलांची एकूण वाढ चांगली होण्यास तर मदत होतेच पण त्यांची उंचीही चांगली वाढते. 

Web Title: What do you do for increasing height of children's ? Simple ways to increase height ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.