लहान मुलांना हुशार बनवण्यासाठी चांगल्या पॅरेंटिंगसोबत सकस आहारही खूप महत्वाचा आहे. मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी सकस आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. बहुतांश मुलं हेल्दी फूड खाणे टाळतात. त्यांना अधिक करून जंक फूड खाण्याची सवय असते. मुलांचे ब्रेन बूस्ट करण्यासाठी त्यांच्या आहारात या ५ पदार्थांचा अवश्य समावेश करा. प्रॉपर डाएटमुळे मुलांच्या विकासात मदत होईल. यासह अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना इतर ॲक्टिव्हिटी देखील करू दिली पाहिजे. ज्यामुळे त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळतो. व ते इतर गोष्टीतही ॲक्टिव्ह होतात.
यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी नुकतंच, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अशाच काही सुपरफूड्सची माहिती दिली आहे, जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कोणते आहेत ते सुपरफुड्स पाहूयात(What foods are good for brain development in kids?).
दही
काही पदार्थ असे असतात की त्यात अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असतात. यात दह्याचा समावेश आहे. दह्यामध्ये आयोडीन असते, जे कॉग्निटिव फंक्शन व मेंदूच्या विकासासाठी मदत करते. यासोबतच दह्यामध्ये प्रोटीन, झिंक, व्हिटॅमिन बी12, सेलेनियम देखील आढळते. दह्याच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता वाढते. रोज एक वाटी दही मुलांना खाऊ घातल्यास हाडे मजबूत होतात.
मुलांना जंक फूड खाण्याची चटक लागली? ३ उपाय, पोटभर जेवतील भरपूर वाढतील
हिरव्या पाले भाज्या
सिझननुसार पालेभाज्या खायला हवे. अनेक मुलं पालेभाज्या खाण्यास नाकं मुरडतात. पाले भाज्यांमध्ये अनेक प्रकारची संयुगे असतात, ज्यामुळे मेंदू सुरक्षित राहते. यामध्ये फोलेट, फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनॉइड्स, व्हिटॅमिन ई, के आढळते. तसेच कॅरोटीनॉइड्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. हिरव्या पालेभाज्या मुलांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात, यामुळे कॉग्निटिव फंक्शन उत्तमरित्या कार्य करते.
शेंगा आणि बीन्स
शेंगा आणि बीन्स अतिशय आरोग्यदायी सुपरफूड आहे. ज्यामुळे मेंदूला अनेक प्रकारे फायदा होतो. यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि फोलेट आढळते. शेंगा व बिन्स खाल्ल्याने मेंदूसह आरोग्य सुधारण्यास मदत होते.
इतर धान्य
मुलांना दररोज गहू, बार्ली, तांदूळ, राजगिरा, ओट्स इत्यादी धान्यांपासून तयार केलेले पदार्थ खायला द्या. हे धान्य ब जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. जे मेंदूचे कार्य व्यवस्थित ठेवतात. या धान्यांचा नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. मेंदूच्या कार्यांना प्रोत्साहन देते.
नट्स आणि सीड्स
सुकामेव्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि ओमेगा -3 भरपूर प्रमाणात आढळते. जे मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे. पिस्त्यात ल्युटीन नावाचे फायटोकेमिकल असते. जे अनेक आरोग्य फायदे देण्याबरोबरच, मेंदूचे कॉग्निटिव फंक्शन देखील सुधारते. भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे मनाचे तसेच शरीराचे रक्षण करते. त्यामुळे नट्स व सीड्सचा समावेश मुलांच्या आहारात करा.