Join us  

मुलांना ओरडले की फार अपराधी वाटतं? मॉम गिल्टचं करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2024 4:21 PM

What Is Mom Guilt and How To Overcome It : 'मॉम गिल्ट' म्हणजे काय? यामुळे मुलांच्या आणि आईच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो का?

मुलं हट्टीपणा करतात. ही एक कॉमन गोष्ट आहे (Parenting Tips). पण मुलांचा हट्टीपणा अति झाला की, पालक आपल्या मुलांवर ओरडतात. कधी कधी हातही उगारतात. नंतर आपल्यालाच त्याचा पश्चाताप होऊ लागतो (Mom Guilt). मुलांना ओरडणे किंवा त्यांच्यावर हात उगारणे हा एक पर्याय उरत नाही (Mother's Love). या गोष्टीमुळे मुलांचे मानसिक स्थिती बिघडू शकते, किंवा ते अधिक हट्टी होऊ शकतात.

बऱ्याचदा मुलांना ओरडल्यानंतर पालक विशेषतः आईच्या मनात गिल्टची भावना निर्माण होते. जर महिला जॉबला जाणारी असेल तर, तिच्या मनात 'मॉम गिल्ट'ची भावना येते. दरम्यान, 'मॉम गिल्ट' म्हणजे काय? यातून बाहेर निघण्यासाठी काय करावे? यासंदर्भातील माहिती कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट डॉ. मुनिया भट्टाचार्य, यांनी दिली आहे(What Is Mom Guilt and How To Overcome It).

मदर गिल्ट म्हणजे काय?

डॉ.मुनिया भट्टाचार्य म्हणतात, आई झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या मनात आपुलकीची भावना जागृत होते. आईला मुलासाठी भरपूर काही गोष्टी करायच्या असतात. पण आई त्या गोष्टी करू शकत नाही. अशा स्थितीत आईच्या मनात गिल्टची भावना निर्माण होते. पण 'मॉम गिल्ट'ची भावना मनात कधी येते?

- मुलाच्या जन्मानंतर काही काळ मुलाची काळजी घेतल्यानंतर पुन्हा नोकरीवर रुजू होणे.

शाळा उघडली की मुलांना खायला द्या ४ पदार्थ, मुलांचं अभ्यासात लागेल लक्ष-वाढेल एकाग्रता

- जॉबवर रुजू झाल्यानंतर मुलांच्या संगोपनासाठी वेळ द्यायला न जमणे.

- जोडीदारासोबत भांडण झाल्यामुळे मुलावर ओरडणे किंवा रागावणे.

- विनाकारण मुलावर हात उगारणे.

- जेव्हा आई स्वतःवर लक्ष केंद्रित करू लागते, यामुळे मुलावर लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.

- एकाच वेळी सर्वकाही हाताळण्यास अडचण निर्माण होणे.

- जेव्हा तणावाचा सामान आपण करीत असतो.

- आईकडून मुलांना लागणाऱ्या गोष्टी न मिळाल्यास, मॉम गिल्टची भावना मनात येते.

मॉम गिल्टवर वेळीच तोडगा कसा काढायचा?

डॉ. मुनिया भट्टाचार्य सांगतात, जर मॉम गिल्टवर वेळीच लक्ष दिले नाही तर, नकळत ही भावना वाढत जाते. यामुळे अनेक प्रकारच्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. यामुळे महिलांना पॅनीक अटॅक देखील येऊ शकते.

चहासोबत कधीही खाऊ नका ५ गोष्टी; अपचन वाढेल कारण तब्येतीसाठी ‘हा’ पदार्थ अतिशयक घातक

- आई झाल्यानंतर महिलांनी स्वतःला सांगायला हवे की खऱ्या आयुष्यात परफेक्ट आई असा कोणताही टॅग नाही. प्रत्येक आईकडून मुलाचे संगोपन करताना काही चुका घडू शकतात.

- मुलासाठी कुटुंबीय आणि मित्रांकडून कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर विनासंकोच मदत घ्या.

- ऑफिसमुळे मुलांकडे लक्ष द्यायला जमत नसेल तर, विकेंडला त्यांच्यासोबत वेळ घालवा. मुलांना फिरायला घेऊन जा, विविध गोष्टी करा. 

टॅग्स :पालकत्वसोशल व्हायरलसोशल मीडिया