मे महिना आता अगदी मध्यावर आला आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी आता अगदी फार फार तर महिना उरला आहे. सुटीत मुलं एवढे धिंगाना घालतात की कधी एकदा जून महिना उजाडतो, शाळा उघडते आणि मुलं शाळेत जातात, असं त्यांच्या पालकांना होऊन जातं. मोठ्या मुलांच्या बाबतीत ही बाब बरीच खरी असली तरी अगदी अडीच- पावणेतीन वर्षांच्या चिमुरड्यांच्या बाबतीतही पालक हाच विचार करतात. ज्यांची मुलं सध्या या वयोगटात आहेत, ते बरेच पालक सध्या मुलांसाठी प्ले ग्रुप शोधण्याच्या कामात गुंतलेले असतील. किंवा काहींनी तर शाळा फायनलही केली असेल. पण चिमुरड्यांच्या बाबतीत ही घाई खरंच योग्य आहे का?
आपल्याकडे आपले आई- बाबा किंवा आजी- आजोबा ४ ते ५ वर्षांचं झाल्यावर पहिल्यांदा बालवाडीत गेले होते, हे त्यांनी कधीतरी तुम्हाला सांगितलं असेलच.
स्टीलच्या नळांना, शॉवरला पांढरट डाग पडले? यापैकी कोणताही १ उपाय करा- नळ होतील चकाचक
पण आताची पिढी मात्र अगदी अडीच- पावणेतीन या वयातच प्ले ग्रुपला जाते आहे. एवढ्या कमी वयात मुलांना शाळेत पाठवणं कितपत योग्य आहे, याविषयीचा एक छानसा व्हिडिओ सध्या vikramsharma_india या इन्स्टाग्राम पेजवरून व्हायरल होत आहे. यामध्ये मुलांना एवढ्या लवकर शाळेत पाठविण्याची किंवा त्यांना एवढ्या लवकर काही शिकविण्याची घाई का आहे, असा प्रश्न विक्रम शर्मा यांनी पालकांना विचारला आहे.
ते म्हणतात खरं तर एवढ्या कमी वयात मुलांना शाळेत पाठविण्याची अजिबात गरज नसते. पण हल्ली बरेच पालक स्वत:ला स्पेस मिळावी किंवा थोडा मी टाईम मिळावा म्हणून मुलांना प्ले ग्रुपमध्ये टाकतात. पण जोपर्यंत मुलांना थोडं फार कळत नाही, तोपर्यंत त्यांना शाळेत पाठवू नये, असं त्यांचं म्हणणं आहे.
केस पातळ झाले? खोबरेल तेलात फक्त २ पदार्थ टाकून डोक्याला मालिश करा- घनदाट होतील
त्यांनी याबाबतीत फिनलँडचे उदाहरण दिले आहे. तिथली मुलं वयाच्या ७ व्या वर्षीपासून शाळेत जातात. पण असं असलं तरी शैक्षणिक बाबतीत सध्या फिनलँड आघाडीवर आहे. त्यामुळे मुलांना थोडा वेळ द्या, खेळू द्या. त्यांना कमी वयातच सगळं काही शिकावं, अशी घाई करू नका, असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला आहे.