Lokmat Sakhi >Parenting > मुलांना फोन देण्याचं योग्य वय काय, स्क्रीन टाईमिंग किती असावं? पाहा-मुलं अजिबात बिघडणार नाही

मुलांना फोन देण्याचं योग्य वय काय, स्क्रीन टाईमिंग किती असावं? पाहा-मुलं अजिबात बिघडणार नाही

What is the right age to give a phone to children : मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवण्यासाठी एक टाईमटेबल बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:18 PM2024-09-19T23:18:36+5:302024-09-19T23:34:51+5:30

What is the right age to give a phone to children : मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवण्यासाठी एक टाईमटेबल बनवू शकता.

What is the right age to give a phone to children, what should be the screen timing | मुलांना फोन देण्याचं योग्य वय काय, स्क्रीन टाईमिंग किती असावं? पाहा-मुलं अजिबात बिघडणार नाही

मुलांना फोन देण्याचं योग्य वय काय, स्क्रीन टाईमिंग किती असावं? पाहा-मुलं अजिबात बिघडणार नाही

मुलं तासनतास फोन घेऊन बसतात या त्रासाने प्रत्येक पालक त्रस्त आहे. आजकाल मुलं पुस्तकांमध्ये मन लावण्याऐवजी आऊटडोअर गेम खेळण्याचा जास्त पसंती देतात. याव्यतिरिक्त टिव्ही आणि फोन पाहायला त्यांना सर्वात जास्त आवडते ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. आई वडील सध्या आपल्या मुलांच्या स्क्रिन टाईमबद्दल निश्चित नसतात. (Parenting Tips) 

मुलांना कमी वयात फोन दिला जातो.  स्क्रीन टाईम किती असावा याबाबत काही सल्ले देण्यात आले आहेत. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कितीवेळ मुलं फोन वापरू शकतात ते समजून घेऊ (What Is The Right Age To Give Phones To Children)


६ वर्षांपर्यंतच्या मुलांनी १ ते २ तासांपेक्षा जास्त स्क्रिन टाईम ठेवू नये. १८ महिन्यांच्या मुलांना फोनपासून दूर ठेवा. फोन किंवा टिव्ही स्क्रिनचा जास्त वापर केल्यानं मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, स्लिपिंग सायकल आणि फिजिकल एक्टिव्हीटीजवर परिणाम होतो.

अभ्यासानुसार मुलांनी जास्त फोनचा वापर केल्यास ब्रेन डेव्हलपमेंटवर याचा परिणाम होतो. डोळे कमकुवत होतात. शरीरााचे पोश्चर खराब होते आणि फोकस करण्याची क्षमता कमी होते. याशिवाय  मुलं सोशल इंट्रॅक्शनपासून दूर होतात आणि क्रिएटिव्हीटी कमी होते. मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणं खूप महत्वाचे आहे कारण  यामुळे मुलांचा अभ्यासातील रस वाढतो. मुलं बाहेर  खेळायला जातील आणि कुटुंबातसोबत वेळ घालवतील.  ज्यामुळे तुमचं आणि मुलांचे बॉन्डींग चांगलं होईल. 

मुलांना स्क्रिनपासून दूर ठेवण्यासाठी एक टाईमटेबल बनवू शकता. जसं की डिनर, ब्रेकफास्ट आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेस त्यांना अजिबात फोन देऊ नका. त्यांना होमवर्क केल्यानंतरच फोन द्या. या पद्धतीने तुम्ही आपल्या मुलांचा स्क्रीन टाईम कमी करू शकता ज्यामुळे त्यांना चांगलं भविष्य देता येईल. 

Web Title: What is the right age to give a phone to children, what should be the screen timing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.