Join us  

अभ्यास करण्याची योग्य पद्धत कोणती? खरंच पहाटे उठून केलेला अभ्यास जास्त लक्षात राहतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 3:52 PM

कुणाला एकाजागी बसून अभ्यास करता येतो, कुणाला गाणी ऐकत, खरंच अभ्यास करण्याची काही स्पेशल पद्धत असते का?

डॉ. श्रुती पानसे

‘किती बरं झालं ना, आपण एकत्र अभ्यास करायचं ठरवलं. आपले तीनही धडे वाचून झाले. एकमेकांसोबत वाचलं की जरा जास्त समजतं बहुतेक.’‘हो ना. आणि मुख्य म्हणजे आपण अजिबात गप्पा न मारता अभ्यास केला ना, म्हणून जरा बरं झालं. एरवी किती बोलतो आपण. पण, आज परीक्षा डोक्यावरच येऊन बसली आहे. त्यामुळे सुधारलो आपण.’‘हो गं.. ए आता काय करू या आपण? प्रश्नोत्तरं लिहून काढायची का?’‘अं.. हो.. तसंच करू या. आपली आपली लिहू या. म्हणजे काय लक्षात राहिलं आहे, हे बघता येईल.’(दोघी मैत्रिणी आपली वही – पुस्तक घेऊन लिहायला लागतात.)थोड्या वेळाने..‘अगं, तू सारखी-सारखी इकडून तिकडे जागा का बदलतेस? एका जागेवर बस ना..मी बघ. एका जागेवरून हललेपण नाहीये. एक तास झाला.’

(Image : google)

‘मी जागा बदलली तुला काही त्रास होतोय का माझा?’‘नाही नाही. तसं नाही.’‘मग?’‘पण, का बदलतेस तू जागा? एकदा टेबलवर, एकदा कॉटवर, एकदा फरशीवर खाली. असं का?’‘मला एका जागेवर जास्त वेळ बसलं की खूप कंटाळा येतो. मी काय वाचते आहे, तिकडे लक्षच राहतनाही माझं. माझ्या ते लक्षात येतं. मग, मी जागा बदलते. मग, मन एकाग्र करायला सोपं जातं.’‘अच्छा..’‘माझ्या बाबांनाही अजिबात आवडत नव्हतं. मी सारखी जागा बदलून अभ्यास करते ते. ते मला सारखे म्हणतात, उठू नकोस जागेवरून. कारण त्यांना लहानपणी तशीच सवय होती. ते कायम एकाच जागी बसून अभ्यास करायचे. त्यांना त्यांच्या टेबलवर त्याच वस्तू हव्या असायच्या. त्यात थोडा बदल झाला तरी एकाग्रता व्हायची नाही म्हणे.’‘मग?’‘मी अभ्यास करताना उठले की त्यांना त्रास व्हायचा. ते खूप रागवायचे मला.’‘पण, मी काय करू? लहान असताना मी त्यांचं ऐकायचे. एका जागी अभ्यास करायचा प्रयत्न करायचे.दहावीच्या अभ्यासाच्या वेळेला मात्र मी त्यांना सांगितलं. बाबा, माझा अभ्यास असाच चांगला होतो.एका जागेवर फार बसलं की चुळबुळ होते माझी. आणि मी सतरा वेळा उठले तरी काही फरक पडतनाही. दुसऱ्या क्षणाला मी एकाग्र करू शकते स्वत:ला.’‘हो???’‘हो. मग काय? उलट मला फ्रेश वाटतं. तसं केलं की. मी यावर वाचलं आहे एके ठिकाणी. प्रत्येकाचामेंदू जसा वेगळा असतो, तशीच त्याच्या अभ्यासाची पद्धत वेगवेगळी असते. काहींचा अभ्यासएकट्याने चांगला होतो. काहींचा मित्र - मैत्रिणींबरोबर.’‘हो बरोबर. मला मनातल्या मनात वाचलेलं नीट लक्षात राहतं. आणि माझा भाऊ मात्रमोठमोठ्याने वाचतो. तो म्हणतो, असं वाचलं तरच मला कळतं.’‘अगं, ताई तर टीव्हीसमोर एवढ्या आवाजात अभ्यास करते, तरी तिच्या लक्षात राहतं. पण, मला मात्र शांतता लागते.’‘तुला माहितीये, आपल्या वर्गातली काही मुलं बागेत अभ्यास करायला जातात. घरात त्यांचं लक्ष लागत नाही. त्यापेक्षा बागेच्या कोपऱ्यात बसतात आणि वाचतात. ते कळतं तरी.’‘मग करू ना मी माझ्या पद्धतीने अभ्यास?’‘हो.. हो.. चालेल.’

(लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि कौन्सिलर आहेत.)संपर्क व्हॉट्स ॲप मेसेज : 7499855830अक्रोड, Brain & Behaviour Courses (मुलांच्या मेंदूत डोकावण्यासाठी))

टॅग्स :पालकत्व