Join us

मुलं खोटं बोलतात-गोष्टी लपवतात? पालकांनी ३ चुका टाळायला हव्या, मुलं स्वत:हून बोलतील मनातलं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2024 16:47 IST

What should Parents do When children lie? : मुलांशी खोटं बोलण्याची सवय सोडवण्यासाठी पालकांनी ३ गोष्टी करायला हव्या

मुलं मोठी झाल्यानंतर अनेक गोष्टी पालकांपासून लपवतात (Parenting tips). किंवा काही गोष्टी फिरवून सांगतात. पालकांना नकळत मुलांमध्ये घडलेला बदल, आणि मुलं आपल्याशी खोटं बोलत आहेत, याची जाणीव होऊ लागते (Child care). कारण कितीही झालं तरी, पालकांना मुलांमध्ये घडलेले बदल दिसून येतात. पण मग मुलं आपल्यापासून गोष्टी का लपवू लागलेत, किंवा का खोटं बोलू लागलेत? याची कारणं शोधून काढणं गरजेचं आहे(What should Parents do When children lie?).

क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट मॅथ्यू राऊस सांगतात, 'मुलं पालकांसोबत अनेक कारणांमुळे खोटं किंवा गोष्टी लपवू लागतात. मुलांना कोणती गोष्ट हवी असेल आणि मुलांना पालकांकडून ती गोष्ट मिळत नसेल तर, अशावेळी ते खोटं बोलतात. तर काही वेळेस मुलांमध्ये आत्मविश्वास नसतो, ज्यामुळे मुलं खोटे बोलू लागतात. तर काही वेळेस पालकांच्या काही चुकांमुळेही मुलं खोटं बोलायला शिकतात.'

मुलं खोटं बोलत असतील तर, पालकांनी 'या' चुका टाळायला हव्या

स्ट्रीक्ट पॅरेण्ट्स

स्ट्रीक्ट पालक मुलांना खोटे बोलण्यास भाग पाडू शकतात. बऱ्याचदा शिक्षा मिळू नये, यासाठी मुलं पालकांपासून गोष्टी लपवू लागतात. ज्यामुळे मुलांना खोटं बोलण्याची सवय लागते. शिवाय उलट उत्तरंही देतात. त्यामुळे सतत त्यांना कठोर वागणूक देऊ नका. चुका सुधारण्यास वेळ द्या.

जास्त खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण? २४ वर्षीय महिलेचा सतत खाल्ल्याने मृत्यू; नक्की झालं काय?

प्रेम आणि आपुलकीचा अभाव

प्रेम आणि आपुलकीच्या अभावामुळे मुलांना एकटं वाटू लागतं. ज्यामुळे नकळत ते पालकांशी खोटं बोलू लागतात. पालकांकडून प्रेम न मिळाल्यास मुलं दूर जाऊ लागतात. तेव्हा ते त्यांच्या भावना आणि समस्या लपवू लागतात. अशावेळी पालकांनी आपल्याला मुलांसोबत वेळ घालवायला हवा.

अनेक वर्षे सुखी संसार करुनही जोडपी घटस्फोट का घेतात? ग्रे डिव्होर्स हे काय नवीनच प्रकरण..

मुलांशी संवाद न साधणे

पालकांनी मुलांशी खुलेपणाने आणि नियमितपणे संवाद साधायला हवा. बऱ्याचदा पालक त्यांचे ऐकत नाहीत. किंवा त्यांची बाजू समजून घेत नाहीत. अशावेळी मुलं पालकांशी गोष्टी लपवू लागतात. खोटे बोलून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. पालकांसोबत गोष्टी शेअर करण्यास उचित समजत नाहीत. त्यामुळे मुलांसोबत संवाद साधत राहा.

टॅग्स :पालकत्वमानसिक आरोग्यसोशल व्हायरल