Lokmat Sakhi >Parenting > मुलं ओरडून बोलतात, मोठ्या माणसांना उलट उत्तरं देतात? २ गोष्टी करा- मुलांचं वागणं बदलेल

मुलं ओरडून बोलतात, मोठ्या माणसांना उलट उत्तरं देतात? २ गोष्टी करा- मुलांचं वागणं बदलेल

Parenting Tips: मुलं ओरडून बोलत असतील, मोठ्या माणसांनाही उलट उत्तरं देत असतील तर या काही गोष्टी करून पाहा... (what to do if child talks so rudely and answers back?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2024 03:14 PM2024-09-21T15:14:59+5:302024-09-21T15:15:52+5:30

Parenting Tips: मुलं ओरडून बोलत असतील, मोठ्या माणसांनाही उलट उत्तरं देत असतील तर या काही गोष्टी करून पाहा... (what to do if child talks so rudely and answers back?)

what to do if child talks so rudely and answers back, how to handle rude behaviour of kids | मुलं ओरडून बोलतात, मोठ्या माणसांना उलट उत्तरं देतात? २ गोष्टी करा- मुलांचं वागणं बदलेल

मुलं ओरडून बोलतात, मोठ्या माणसांना उलट उत्तरं देतात? २ गोष्टी करा- मुलांचं वागणं बदलेल

Highlightsत्यांना न रागावता, त्यांच्यावर आरडाओरडा न करता त्यांची ही सवय बंद करायची असेल तर या काही गोष्टी करून पाहा...

मुलांनी धिंगाणा करणं, गोंधळ घालणं हे सगळं समजण्यासारखं आहे. कारण धिंगाणा, बिंधास्त खेळणं हे सगळं लहानपणी करणार नाहीत तर मग केव्हा करणार.. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चालतात. पण मुलं जर त्यांच्यासोबतच्या मुलामुलींशी, मोठ्या माणसांशी ओरडून बोलत असतील, नेहमीच उलट उत्तरं देत असतील, सगळ्यांवर चिडचिड करत असतीत तर ते मात्र अतिशय चुकीचं आहे. मुलांची ही सवय कमी करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर आणखी जोरात ओरडणं काही बरोबर नाही (what to do if child talks so rudely and answers back?). म्हणूनच त्यांना न रागावता, त्यांच्यावर आरडाओरडा न करता त्यांची ही सवय बंद करायची असेल तर या काही गोष्टी करून पाहा... (how to handle rude behaviour of kids?)

 

मुलं ओरडून बोलतात, मोठ्या माणसांना उलट उत्तरं देतात?

मुलं उलट उत्तरं देत असतील, नेहमीच चिडक्या स्वरात बोलून किरकिर करत असतील तर अशावेळी काय उपाय करावा, याविषयीची माहिती पॅरेंटिंग एक्सपर्टने vishruti_joyes_parenting या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

मुलांचा स्क्रिनटाईम कमी करण्यासाठी करिना कपूरने केली 'ही' युक्ती! तुमच्याही नक्कीच कामी येईल

यामध्ये त्यांनी जे दोन उपाय सांगितले आहेत त्यापैकी पहिला उपाय म्हणजे मुलांचे पालक मुलांशी अशाच भाषेत नेहमी बोलतात का हे एकदा तपासून पाहा. जर मुलांवर त्यांच्या पालक नेहमीच आरडाओरडा करत असतील, इतर गोष्टींचा राग मुलांवर काढत असतील तर बऱ्याचदा मुलांनाही तशीच सवय लागते आणि त्यांचे पालक त्यांच्याशी जसं वागतात, तसंच ते पालकांशी आणि इतर लोकांशी वागतात. त्यामुळे जर तुमच्याकडून तशी चूक हाेत असेल तर ती सुधारा.

 

दुसरं म्हणजे जेव्हा मुलं तुम्हाला उलट उत्तरं देतील किंवा एखादी गोष्ट खूप चिडून, ओरडून तुम्हाला सांगतील तेव्हा ती गोष्ट शांतपणे ऐका. पण मुलांचं बोलून झाल्यानंतर मात्र त्यांची गोष्ट बरोबर होती, पण सांगण्यातला स्वर मात्र चुकीचा होता हे त्यांना समजावून सांगा.

स्वत:चा कॉन्फिडन्स वाढविण्यासाठी ५ गोष्टी करा, चारचौघांसमोर बोलण्याची भीती निघून जाईल

हळू आवाजात तीच गोष्ट पुन्हा सांगितली तरच ती ऐकली जाईल हे त्यांना समजावून सांगा आणि पुन्हा त्यांना तीच गोष्ट हळू आवाजात, नॉर्मल टोनमध्ये सांगायला सांगा. सुरुवातीला मुलं चिडतील, पण तुम्ही तुमचा आवाजातला शांतपणा. संयम टिकवून ठेवला तर त्यांच्यात नक्कीच फरक पडेल.


 

Web Title: what to do if child talks so rudely and answers back, how to handle rude behaviour of kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.