Join us  

घरचे जेवण नको म्हणत मुलं नखरे करतात? ३ जबरदस्त ट्रिक्स; मुलं बाहेरचं खाणं टाळतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2024 5:27 PM

What to do if children do not eat homemade food? : घरचे पदार्थ मुलं आता आवडीनं खातील; बाहेरच खाणं टाळतील - फक्त ३ गोष्टी करा

पौष्टिक आहार (Healthy Food) खाल्ल्याने शरीराची योग्य वाढ होते (Parenting Tips). पण शरीराला पौष्टिक घटक न मिळाल्याने मुलांची योग्य वाढ होत नाही. पण मुलं हेल्दी पदार्थ खात नाहीत (Homemade Food). ज्यामुळे मुलांची वाढ होत नाही. मुलांसह मोठ्यांनाही फास्ट फूड खाण्याची सवय लागली आहे. ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही. शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

मुलं भाज्या, डाळी, भात, चपाती खाताना फार नखरे करतात. मुलांनी सगळ्या प्रकारच्या भाज्या खाव्या असं प्रत्येक पालकाला वाटत असतं. जर आपलंही मुल घरचं कमी बाहेरचे पदार्थ ताव मारून खात असेल तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे मुलं घरचं जेवण आवडीने खातील. शिवाय भाज्या, डाळी नाक मुरडत खाणार नाहीत(What to do if children do not eat homemade food?).

दररोज वेगवेगळे पदार्थ बनवून खायला द्या

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'घरी बनवलेलं अन्न मुलं नाक मुरडत खातात. पौष्टिक पदार्थ खाताना कंटाळा करतात. त्यांना जर पौष्टिक पदार्थ खायला आवडत नसतील तर, त्याच्यामध्ये ट्विस्ट द्या. सॅण्डविच, पॅटिस किंवा पराठे करून मुलांना खायला द्या. मुलं हे पदार्थ आवडीने खातील.

बॉयफ्रेंडने फ्राईड फूड ऑर्डर केलं म्हणून मी ब्रेकअप केलं होतं, कारण..रकुल प्रीत सिंग म्हणते..

योग्य वेळी आहार खायला द्या

अनेक वेळा कामामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पालक आपल्या मुलांना वेळेवर जेवण देऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांची भूक मंदावते. त्यामुळे भूक नसल्या कारणाने मुलं खाणं टाळतात, आणि शरीराला योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे मुलांना योग्य वेळी खायला द्या.

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

मुलांना व्यायाम करायला सांगा

शारीरिक हालचाल कमी असेल तर, भूक जास्त लागत नाही. भूक कमी लागल्याने आपण खूप कमी खातो. जर मुलांना जास्त भूक लागत नसेल तर, त्यांना व्यायाम करायला सांगा. त्यांच्या शारीरिक हालचालीकडे लक्ष द्या. काही मुलं घरात बसून तासंतास मोबाइल फोनमध्ये घालवतात. त्याऐवजी त्यांना विविध खेळ शिकवा. 

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स