Join us  

बाळ पलंगावरुन किंवा झोळीतून पडलं तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काय कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2023 3:25 PM

What To Do If Your Baby Falls Off The Bed? बाळ पडलं तर आईबाबा खूप घाबरतात, मात्र पॅनिक न होता, डॉक्टरकडे तातडीने जायला हवं..

घरात चिमुकल्याचं आगमन झाल्यावर, घरच्यांचा उत्साह गगनात मावत नाही. लहानग्यासह मोठी लोकं देखील छोटी होतात. एकंदरीत आनंदाचा माहोल घरात असतो. परंतु, बाळाची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. लहान बाळ अगदी नाजूक असतं, त्याला काय हवे, काय नको याची काळजी घरातल्या प्रत्येकाला घ्यावी लागते. त्याला जर दुखलं - खुपलं तर आपल्याला कळायला थोडे कठीण जाते.

बाळ ६ ते ८ महिन्याचे झाल्यानंतर रांगायला लागतं, काही वेळेला रांगता - रांगता बेड अथवा उंचीवरून पडतं. त्यावेळेला बाळाला कुठे लागलं आहे का? हे शोधणं अवघड जातं. बाळ झोपलं जरी असेल तरी आईच्या मनात धाकधूक कायम असते. बाळ पडल्यावर त्याची कशी काळजी घ्यावी, व कोणती लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे पाहूयात(What To Do If Your Baby Falls Off The Bed?).

पडल्यानंतर बाळ ठीक आहे हे कसे कळेल?

बेबी चक्र या वेबसाईटला माहिती देताना, कम्युनिटी एक्स्पर्ट डॉ पूजा मराठे म्हणतात, ''प्रथम, घाबरू नका. बाळाला जवळ घ्या, व त्याला कुठे लागले आहे की नाही याची तपासणी करा. त्यांच्या संपूर्ण अंगाला चाचपून पाहा. ज्यामुळे त्यांना कुठे दुखापत होत आहे हे समजून येईल. जखमांसह त्यांच्या डोक्याची देखील तपासणी करा. मेंदूला झालेली इजा ही बाळाच्या उंचीवर अवलंबून असते. जर उंची जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.''

कोथिंबिरीचा रस प्याल्याने किडनीचे आजार, युरीन इन्फेक्शन कमी होतात का? तज्ज्ञ सांगतात...

बाळ कधी पडतं?

काही महिन्यानंतर बाळ रांगायला लागते. तेव्हा ते चालण्याचे अथवा उठण्याचे प्रयत्न करतात. पण अनेकदा आपले लक्ष नसताना, खेळताना किंवा रात्रीच्यावेळी झोपताना बाळ पडते. बाळ पडल्यावर त्याला नेमकं कुठे लागलं? त्याला नक्की कुठे त्रास होत आहे? त्याला शांत करण्यास संपूर्ण घर सज्ज होते. बाळ पडल्यावर या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. काही वेळेला अशा काही जखमा असतात, जे आपल्याला दिसत नाही, पण डॉक्टरांना ते कळून येतात. त्यामुळे बाळ पडल्यावर या गोष्टींना दुर्लक्षित करू नका.

बाळ बेडवरून पडल्यावर काय करावे?

बाळ बेडवरून अथवा उंचीवरून पडले असेल तर, तर त्याला सर्वप्रथम जवळ घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करा. कारण बाळ अचानक उंचीवरून पडल्यावर खूप घाबरते. त्यामुळे ते रडत असते. काही वेळेला बाळांना अंतर्गत दुखापत होते. बाळ जर रडायचे थांबत नसेल तर, तातडीने डॉक्टरांकडे दाखवावे.

लहान मुलं सतत नाकात बोट घालतात? हे नक्की कशाचे लक्षण, ही सवय कशी मोडायची

बाळाला जर जखम झाली तर काय करावे?

बाळ पडल्यावर डोक्यावर टेंगुळ उठते, अथवा रक्तस्त्राव होतो. भिंतीचा कोपरा लागला की डोक्याला मार बसतो. रक्तस्त्राव होत असेल तर, एक कापड घेऊन ते रक्त थांबवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा.

बाळ पडल्यानंतर या गोष्टींकडे लक्ष ठेवा

कंबर - नितंबावरील चरबी वाढली? ३ सोपी योगासने नियमित, बेढब शरीर होईल सुडौल

बाळ जर उंचीच्या ठिकाणावरून अथवा चालत असताना पडले असेल, तर निदान ६ ते १२ तासांसाठी त्याच्याकडे लक्ष ठेवा.

बाळ पडल्यानंतर उलटी करत आहे की नाही याकडे लक्ष द्या. करत असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.

बाळ पडल्यानंतर अधिक वेळ झोपत असेल तर ते चांगले नाही. बाळाला आतून दुखापत झाली असावी.

बाळ पडल्यानंतर जर चिडचिड करत असेल तर, ही बाब चांगली नाही.

झोपताना बाळ वळणे घेताना रडत असेल तर, नक्कीच त्याला दुखापत झाली असेल, अशावेळी डॉक्टरांना दाखवावे.

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्सआरोग्य