Lokmat Sakhi >Parenting > मुलं तुमच्याशी खोटं बोलतात, गोष्टी लपवतात? करा फक्त ३ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात...

मुलं तुमच्याशी खोटं बोलतात, गोष्टी लपवतात? करा फक्त ३ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात...

What to do if your child is lying, thowing tantrums or hiding things from you : निराश न होता नेमकं काय करायचं याबाबत समजून घ्यायला हवे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2023 02:09 PM2023-10-18T14:09:56+5:302023-10-18T14:12:19+5:30

What to do if your child is lying, thowing tantrums or hiding things from you : निराश न होता नेमकं काय करायचं याबाबत समजून घ्यायला हवे...

What to do if your child is lying, thowing tantrums or hiding things from you : Kids lie to you, hide things? Do Just 3 Things, Experts Say… | मुलं तुमच्याशी खोटं बोलतात, गोष्टी लपवतात? करा फक्त ३ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात...

मुलं तुमच्याशी खोटं बोलतात, गोष्टी लपवतात? करा फक्त ३ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात...

मुलं मोठी होत जातात तशी त्यांची विविध गोष्टींची समज वाढत जाते आणि कोणत्या परिस्थितीत, कोणत्या व्यक्तींशी कसं वागायचं याचा स्मार्टपणा त्यांना सहज कळत जातो. लहानपणी निरागस असणारं हेच मूल मोठं झालं की आपल्यापासून काही गोष्टी लपवते किंवा चक्क काही बाबतीत खोटंही बोलतात. यामागे त्यांचा उद्देश चुकीचाच असतो असं नाही पण आपण ओरडू, रागवू किंवा अमुक गोष्ट त्यांना करु देणार नाही यासाठी ते असे वागतात. ते आपल्या फायद्याचे आहे की तोट्याचे हे कळण्याइतका शहाणपणा नसल्याने ते असं वागून पाहतात. त्यांच्या अशा वागण्यावर आपण कसे रिअॅक्ट होतो, त्याचे परीणाम काय होतात याचा ते अंदाज घेतात आणि हे वागणं कायम ठेवायचं की थांबवायचं हेही ठरवतात (What to do if your child is lying, thowing tantrums or hiding things from you). 

शाळेत जायला लागले, मित्रमंडळींमध्ये वावरायला लागले की या शहाणपणाच्या गोष्टी कोणीही न शिकवता त्यांच्यामध्ये येतात आणि त्या त्यांना करुनही पहायच्या असतात. आता मुलं आपल्याशी खोटं बोलली आहेत, त्यांनी आपल्यापासून काही लपवले आहे किंवा ते जास्त नखरे करत आहेत असं जर तुमच्याही बाबतीत होत असेल तर यामागची कारणे समजून घेऊन त्यावर योग्य ते उपाय करायला हवेत. आपण त्यांच्या या वागण्यावर चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या तर त्याचा वेगळाच परीणाम होण्याची शक्यता असू शकते. अशावेळी निराश न होता नेमकं काय करायचं याबाबत प्रसिद्ध समुपदेशक प्रिती वैष्णवी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. पाहूयात या टिप्स कोणत्या आणि त्या कशा फॉलो करायच्या...

असं होत असेल तर नेमकं काय करावं?

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं असं करत असतील तर वाईट वाटून घेण्याची किंवा जजमेंटल होण्याची अजिबात आवश्यकता नाही. तर अशावेळी मुलांशी कनेक्ट होण्याची किंवा त्यांच्यासोबतचे आपले नाते दृढ करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे. यासाठी आवश्यक असणाऱ्या ३ गोष्टी...

१. तुमचे मूल लहान असेल तर दिवसातून किमान अर्धा तास त्याच्यासोबत मनापासून खेळायला हवे. यामुळे तुमच्यातले बॉंडींग चांगले होण्यास मदत होईल. मनापासून त्यांच्यासोबत खेळल्याने त्यांचे आणि तुमचे एकप्रकारचे नाते तयार होईल आणि कनेक्शन वाढण्यास नकळत मदत होईल.

२. मुंलासोबत काही वेळ बसून काही ना काही गोष्टी तयार करायला हव्यात. यामध्ये विविध क्राफ्टच्या गोष्टी, भाज्या निवडणे, किराणाा सामान किंवा भाजीपाला लावून ठेवणे, झाडांना पाणा घालणे, कपड्यांच्या घड्या करणे अशा लहान मोठ्या बऱ्याच गोष्टींचा समावेश असू शकतो. 

३. मुलांशी दररोज भरपूर गोष्टींवर गप्पा मारणे आणि त्यांच्याशी मोकळा संवाद असणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ते शाळेत किंवा पाळणाघरात जात असतील तर तिथे त्यांनी काय काय केलं, त्यांचे मित्रमैत्रीणी, शिक्षक, डब्यातला खाऊ, रीक्षावाले काका, त्यांच्या आवडीचे कार्टून अशा कोणत्याही गोष्टीवर किंवा त्यांना आवडणाऱ्या कोणत्याही विषयावर त्यांच्याशी बोलल्यास ते रिलॅक्स फील करतात. इतकेच नाही तर त्यांचे म्हणणे जास्तीत जास्त ऐकून घेतले तर त्यांना आपल्याजवळ जास्त कम्फर्टेबल वाटू शकते. 

Web Title: What to do if your child is lying, thowing tantrums or hiding things from you : Kids lie to you, hide things? Do Just 3 Things, Experts Say…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.