Join us  

लहान मुलांनी खेळता खेळता नाणं, लहानशी वस्तू चुकून गिळलीच तर..? डॉक्टर सांगतात, तातडीने काय करायचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 4:43 PM

What to Do If Your Child Swallows Something आपलं घर चाइल्ड फ्रेण्डली असावं, मुलांच्या हातात लहान वस्तू, मणी, औषणं लागणार नाही याची खबरदारी पालकांनी घ्यायलाच हवी पण चुकून काही गिळलंच तर..

काय खावं काय खावू नये, हे लहान मुलांना कळत नाही. काही मुलांना जमिनीवर पडलेल्या गोष्टी उचलून तोंडात टाकण्याची सवय असते. मग कधी पेन्सिल किंवा नाणं तोंडात घालून चघळत बसतात. कधीतरी चुकून लहानशी वस्तू गिळतातही. अशा परिस्थितीत पालक अतिशय गोंधळून जातात. काय करावं? हे सुचत नाही. खरंतर मुलांकडे लक्ष ठेवून, त्यांच्या हाती लहान वस्तू लागणार नाही आपलं घर चाइल्ड फ्रेण्डली असेल याचाच विचार करायला हवा. कारण असं लहान काहीतरी गिळणं जीवघेणं ठरु शकतं. पण चुकून असं काही झालं तर(What to Do If Your Child Swallows Something).

तातडीने पालकांनी काय करायला हवं?

यासंदर्भात, आजतक वेबसाईटला माहिती देताना डॉ राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे बालराेगतज्ज्ञ डॉक्टर दिनेश कुमार सांगतात, ''लहान बाळांकडे सतत लक्ष द्यावे लागते. पण कधीतरी नजरचुकीने अपघात होता. पालक आसपास नसतील तर मुलांजवळ लहान गोष्टी पडलेली नाही, याची काळजी घ्या. औषधांपासून इतर गोष्टी त्यांच्या हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. त्यांच्या जवळ पैसे अथवा कोणतींही लहान वस्तू ठेऊ नये. जर त्यांनी नाणं अथवा इतर गोष्टी गिळल्या तर तातडीने डॉक्टरकडे जा.

लहान मुलं माती का खातात? ही सवय तोडण्यासाठी ४ उपाय, सांभाळा आरोग्य

घरगुती उपाय करत वेळ वाया घालवू नका. बाळाला उलटी करण्यास भाग पाडू नका. पालक मुलांच्या घशात काही अडकल्यास त्याला उलटी करायला सांगतात. पण नाणं अडकले असेल तर, असे करू नये. उपचार करूनच नाणे बाहेर काढावे. कारण लहान मुलांचे अवयव नाजूक असतात. अनेकदा नाणं किंवा हार्ड वस्तू, अन्ननलिकेत न जाता, फुफ्फुसात जाऊन अडकते. ज्यामुळे एक्स - रे काढावे लागते. अशा परिस्थितीत बालरोग शल्यचिकित्सकांच्या मदतीने ते बाहेर काढणे आवश्यक ठरते.

जर मुलाने नुकतंच तोंडात नाणं घातलं असेल तर, सर्वप्रथम मुलाला पुढे वाकवा. त्यानंतर त्यांची छाती एका हाताने दाबा. आता तुम्हाला त्याच्या पाठीवर दुसऱ्या हाताने ५-६  वेळा जोरात थाप द्यावी लागेल. असे २ ते ३ वेळा करा. असे केल्याने मुलांच्या छातीत कफ तयार होईल, व खोकल्याबरोबर नाणे बाहेर पडू शकते.

बाळ पलंगावरुन किंवा झोळीतून पडलं तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी काय कराल?

मुलांनी गिळलेल्या गोष्टी, एंडोस्कोपिक पद्धतीने काढल्या जाऊ शकतात. यामध्ये लहान कॅमेरा आणि प्रकाश असलेली एक पातळ, लवचिक ट्यूब बाळाच्या तोंडात घातली जाते. ते सारं डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि वेळेत करायला हवं.

टॅग्स :पालकत्वहेल्थ टिप्स