Join us  

मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 2:13 PM

What to do when kid doesn't want to study : मुलं स्वतः अभ्यासाला बसतील, त्यांच्या मागे अभ्यास कर म्हणून तगादा लावायची गरजच पडणार नाही

जून महिना सुरु झाला, की सगळयांना शाळेचे वेध लागते (Parenting Tips). पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात शाळा सुरु होतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं भरपूर मज्जा मस्ती करतात (Child care). या दिवसात अभ्यासाची सवय काहीशी मोडते (School reopens). मुलं फार चंचल मनाची असतात (Study Tips). काही मुलं लगेच अभ्यासात लक्ष घालतात. पण काही आपल्या सुट्टीच्या आठवणीत रमतात.

मुलांना अभ्याची गोडी लागावी म्हणून आपण काही गोष्टी करू शकता. यामुळे मुलं मोबाईल, गेम्स, इंटरनेट या सगळ्या गोष्टी सोडून अभ्यासाला स्वतः बसतील. शिवाय त्यांच्या मागे अभ्यास कर म्हणून तगादा लावण्याची गरज पडणार नाही(What to do when kid doesn't want to study).

मुलांना अभ्यासाची गोड 'अशी' लावा..

अभ्यास मनोरंजक बनवा

काही पालक मुलांना अभ्यास कर म्हणून त्यांच्या मागे तगादा लावतात. त्यामुळे मुलं स्वतः अभ्यापासून दूर पळतात. पण आपण मनोरंजक पद्धतीने त्यांना शिकवलं तर, निश्चित त्यांना अभ्यासाची गोडी लागेल. थिअरी विषयांशी संबंधित व्हिडिओ दाखवून किंवा प्रॅक्टिकलच्या मदतीने त्यांना पुस्तकातले काही मुद्दे समजावून सांगा. यामुळे त्यांना अभ्यासाची गोडी लागेल.

FSSAI म्हणते भेसळयुक्त कूकिंग ऑइल खाणं टाळा; गंभीर आजारांचा धोका वाढेल - सारखं आजारी पडाल

वेळापत्रक सेट करा

पालकांनी मुलांसाठी एक वेळापत्रक सेट करायला हवे. ज्यात अभ्यासापासून ते खेळापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश केला पाहिजे. मुलांना वेळापत्रक फॉलो करायला सांगा. यामुळे मुलांना वेळापत्रक फॉलो करण्याची शिस्त लागेल. शिवाय वेळेत काम पूर्ण करण्यास मुलं शिकतील.

मुलांच्या प्रश्नांची उत्तरं द्या

मुलाने अभ्यासाशी संबंधित कोणताही प्रश्न विचारला तर, त्याचे कौतुक करा. अनेकदा मुलं त्यांच्या मनात निर्माण होणारे प्रश्न विचारणं टाळतात. यामुळे मुलांचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होत नाही. त्यामुळे इच्छा असूनही मुलं अभ्यासाला बसत नाहीत. म्हणून मुलांच्या प्रश्नांची उत्तरं देत राहा.

पालकाची भाजी नेहमीचीच, करा पालकाची चटणी! तोंडी लावण्यासाठी चमचमीत पदार्थ, पालक आवडायला लागेल

मार्क कमी पडल्यास ओरडू नका

मुलांना कमी मार्क्स मिळाल्यास त्यांची खरडपट्टी काढण्यापेक्षा, त्यांना पुढच्या वेळेस अभ्यासात अधिक मेहनत घेण्याचा सल्ला द्या. मुलांना कमी मार्क्स मिळाल्यानंतर काही पालक ओरडतात, चिडतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे ओरडण्यापेक्षा अभ्यासाचे महत्व पटवून द्या.

टॅग्स :Shalechi Taiyariविद्यार्थीशाळापालकत्व