Join us  

अभ्यास कर म्हणून सतत मुलांच्या मागे लागता, आईबाबांनी न चिडता करायला हवे ४ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2024 12:52 PM

What to do if your child refuses to study : How to deal with a child who is not interested in Studies : मुलानं सतत अभ्यास कर म्हणून सांगावे लागत असेल तर पालकांनी कराव्यात अशा सोप्या ४ ट्रिक्स...

काही पालकांना "अभ्यास कर" म्हणून मुलांच्या पाठी सतत ओरडावे लागते. पालकांना नेहमीच वाटते आपल्या पाल्याने न सांगता अभ्यास केला पाहिजे. आपण मुलांना न सांगता, जोरजबरदस्ती न करता मुलांनी अभ्यास करावा एवढीच (Parenting Tips) इच्छा त्यांची असते. परंतु मुलं नेहमी या उलटच वागतात. मुलांना कितीही वेळा समजावून, दम देऊन, ओरडून सांगितले तरी ते पालकांचे ऐकत नाहीत(What to do if your child refuses to study).

काही मुलं ही अभ्यासाच्या बाबतीत फार काटेकोर असतात. अशी मुलं लक्ष देऊन काळजीपूर्वक आपला अभ्यास करत असतात. परंतु काही मुलांना अभ्यासाचे नाव जरी घेतले तरी नको वाटते. अशावेळी नेमके काय करावे असा पालकांना प्रश्न पडतो. मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होईल अशा काही गोष्टी (4 Tips to get kids to focus on studies) आपण नक्की ट्राय करु शकतो. या उपायांमुळे मुलं लक्षपूर्वक अभ्यास तर करतीलच, पण सोबतच अभ्यास कर म्हणून पालकांना त्यांच्या मागे धोशा लावावा लागणार नाही(How to deal with a child who is not interested in Studies).

मुलं अभ्यास करत नसतील तर काय करावे ? 

१. अभ्यासपूर्वक वातावरण :- अभ्यासासाठी नेहमी शांत जागा निवडा. अभ्यासाची जागा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा. शक्य असल्यास नैसर्गिक प्रकाश असलेल्या ठिकाणी बसून अभ्यास करा. अभ्यास करण्यासाठी आरामदायी खुर्ची आणि टेबल वापरा ज्यावर पाल्य आरामात बसू शकेल. अभ्यास करताना तुमचा फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप यासारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेहमी बंद ठेवा. 

२. अभ्यासाचे वेळापत्रक बनवा :- अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि नेहमी त्याचे अनुसरण करा. दररोज लहान गोल सेट करा. अभ्यास करताना काही वेळानंतर नियमित ब्रेक घ्या. दर ४५ ते ६० मिनिटांनी ५ ते १० मिनिटांचा ब्रेक घ्या. पुरेशी झोप घ्या, दररोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. निरोगी आणि संतुलित अन्नपदार्थ खा जे तुम्हाला ऊर्जा देतील. नियमित व्यायाम केल्याने तुमची एकाग्रता सुधारू शकते.

मुले मोठी झाली तरी अंथरून ओले करतात ? पाहा अंथरुणात शू करण्याचंही कारणे आणि उपाय... 

३. अभ्यास करण्याच्या टेक्निक शिकवा :- पोमोडोरो टेक्निक वापरा. पोमोडोरो टेक्निक मध्ये २५ मिनिटे काम आणि ५ मिनिटांचा ब्रेक घेतला जातो. माइंड मॅपिंग वापरा. कठीण संकल्पना समजून घेण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी माइंड मॅपिंग टेक्निक वापरा. शब्दसंग्रह किंवा तथ्ये लक्षात ठेवण्यासाठी फ्लॅशकार्ड वापरा. ऑनलाइन ट्यूटोरियल, व्हिडिओ आणि लेखांसह अनेक ऑनलाइन साधने उपलब्ध आहेत जी मुलांना अभ्यासात मदत करू शकतात.

४. मानसिकता :- मुलांना नेहमी सकारात्मक राहायला शिकवा. त्याचबरोबर त्यांना नेहमी स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यास शिकवा. मुलांची उद्दिष्ट्ये काय आहेत हे समजून ते उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करा. ध्यानधारणा केल्याने मुलांची एकाग्रता सुधारू शकता. कोणाचीही मदत मागायला घाबरू नका असे मुलांना कायम शिकवा. मुलांना एखादा विषय समजण्यात अडचण येत असल्यास, त्यांचे शिक्षक, वर्गमित्र किंवा ट्यूटरची मदत घेण्यास शिकवा. आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि एका व्यक्तीसाठी जे सोपे असते ते दुसऱ्यासाठी सोपे नसते. मुलांची पुस्तके, नोट्स आणि स्टेशनरी यांसारख्या अभ्यासासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट मुलांकडे असल्याची खात्री करा.

टॅग्स :पालकत्व