Lokmat Sakhi >Parenting > मुलं ऐकत नाहीत म्हणून सतत ओरडता? ३ टिप्स; मुलं ऐकतील - स्वतःमध्ये बदलही करतील

मुलं ऐकत नाहीत म्हणून सतत ओरडता? ३ टिप्स; मुलं ऐकतील - स्वतःमध्ये बदलही करतील

What To Do When Kids Won't Listen : न ओरडता, न रागवता मुलं सभ्य, शांत होतील; फक्त ३ टिप्स फॉलो करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2024 04:09 PM2024-09-16T16:09:22+5:302024-09-16T16:10:28+5:30

What To Do When Kids Won't Listen : न ओरडता, न रागवता मुलं सभ्य, शांत होतील; फक्त ३ टिप्स फॉलो करा

What To Do When Kids Won't Listen | मुलं ऐकत नाहीत म्हणून सतत ओरडता? ३ टिप्स; मुलं ऐकतील - स्वतःमध्ये बदलही करतील

मुलं ऐकत नाहीत म्हणून सतत ओरडता? ३ टिप्स; मुलं ऐकतील - स्वतःमध्ये बदलही करतील

जगभरातील ट्रेण्ड, लाईफस्टाईल आणि लोकांच्या सवयी या बदलत चालल्या आहेत (Parenting Tips). अशा स्थितीत मुलांना संस्कार लावण्यामध्येही बदल घडत आहेत (Mental health). मुलं ही हट्टी असतात. पण काही फार हट्टी असतात. पालकांचे ते म्हणणे ऐकून घेत नाहीत. पालकांना उद्धट उतरं देतात.

अशावेळी पालकही मुलांवर हात उगारतात. त्यांना ओरडतात. ज्यामुळे मुलं मानसिकरित्या खचतात, आणि त्यांना त्रास होतो. त्यांचं कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही, आणि याचा परिणाम अभ्यासावरही दिसून येतो. जेव्हा पाल्य पालकांचे ऐकत नाही तेव्हा ते त्यांच्यावर रागावतात. पण न रागावता मुलांना समजावून सांगायचं असेल तर ३ टिप्स फॉलो करा. चीड चीड न करताही मुलांना शिस्त लागेल(What To Do When Kids Won't Listen).

स्वातंत्र्य द्या

जर मुलं आपलं ऐकत नसतील तर, त्यांच्यासोबत मित्राप्रमाणे वागा. जर पालक म्हणून वागणूक द्याल तर, कदाचित तुमच्यापासून मुलं लांब जाऊ शकतील. त्यामुळे मुलांना अडवणूक लावू नका, ओरडू नका आणि स्वातंत्र्य द्या. त्यांना हवे ते करण्याची संधी द्या. शिवाय त्यांच्या निर्णयाला सपोर्ट करा.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

आदर द्या

मुलाने आपलं ऐकावं आणि आदर करावा असं वाटत असेल तर, मुलांचाही आदर करा. त्यांना काही गोष्टी करायच्या असतील तर, करू द्या. यामुळे मुलं आनंदी होतील. त्यांना अडवणूक लावू नका. मुलांचा कोणत्याही व्यक्तीसमोर अनादर करू नका.

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

संयम ठेवा

स्वतःला नेहमी सकारात्मक ठेवा. यामुळे मुलंही सकारात्मक राहतील. नकारात्मक राहिल्यावर आपण आपल्या मुलांना ओरडू शकता, आणि हातही उगारू शकता. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांच्यावर ओरडू नका, संयमाने गोष्टी हाताळा. 

Web Title: What To Do When Kids Won't Listen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.