जून महिना सुरु झाला की, शाळेत जाण्यासाठी मुलांची लगबग सुरु होते. शाळा म्हटलं की आजही काही मुलं रडणं सुरु करतात. तर काही मुलं हसत - खेळत शाळेत जातात. काही मुलं शाळेच्या वातावरणात मिसळतात तर, काही रडून - रडून घर डोक्यावर घेतात. त्यांना शाळेत आपल्या पालकांची आठवण येत राहते. मुलांचं हे असं वागणं पालकांसाठी अतिशय त्रासदायक ठरतं. पालकही मुलांच्या अशा वागण्याला बळी पडतात आणि मुलांना घरीच ठेवून घेतात. पण या कारणामुळे त्यांचा अभ्यासक्रम मागे पडत जातो(What to Do When Your Child Doesn't Want to Go to School).
अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलाच्या समस्या समजून घेऊन, त्या दूर करण्यासाठी उपाय आखले पाहिजेत. काही पालक आपल्या मुलांवर हात उगारतात. ज्यामुळे त्यांच्या कोमल मनावर परिणाम होतो. मुलांना ओरडून किंवा मारून त्यांना शाळेत घालवण्यापेक्षा या टिप्स फॉलो करा. या टिप्समुळे मुलं स्वख़ुशीने हसत - खेळत शाळेत जातील.
लहान मुलांना शाळेत जाण्याची का भीती वाटते?
- अनेक वेळा मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यांना अपयशाची भीती वाटत राहते.
- अनेक मुलांना शाळेचे नियम पाळणे कठीण जाते आणि त्यांना एकटेपणा जाणवू लागतो.
- जर शाळकरी मुले प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करत असतील, आणि मुलं पुन्हा पुन्हा हरत असतील, तर यामुळे देखील मुलं शाळेत जाण्यासाठी नकार देऊ शकतात.
मुलांचा मेंदू तल्लख व्हावा, हुशार व्हावी मुलं असं वाटतं? आहारात हवेच ५ पदार्थ
- बहुतांश मुलांना असे वाटते की शाळेत गेल्यावर ते आपल्या पालकांपासून वेगळे होतील, ज्यामुळे त्यांना आपल्या पालकांची आठवण येत राहते.
- अनेक वेळा शिक्षकाच्या भीतीमुळे देखील ते शाळेत जाण्यास नकार देतात.
शाळेत जाण्यासाठी मुलांना असे करा तयार
मुलांना मानसिकदृष्ट्या तयार करा
इंडिया पॅरेंटिंग या वेबसाईटनुसार, मुलासोबत शाळेत विजिट करा, वर्गशिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी इत्यादींची भेट घेऊन आपल्या पाल्यांची देखील भेट घडवून द्या. त्यांच्यासोबत मैत्री करवून द्या. जेणेकरून आपल्या मुलांना इतरांची भीती वाटणार नाही. त्यांना गोष्टी सांगून हसवण्याचा प्रयत्न करा.
चेहऱ्यावर सकारात्मक भावना ठेवा
मुलांना शाळेत पाठवताना ओरडू नका, यामुळे मुलं अजून घाबरतात. मुलं शाळेत जाण्यासाठी का नकार देत आहेत. यामागचं कारण जाणून घ्या. व त्यांना सकारात्मक भावनेने समजावून सांगा. शांतपणे व प्रेमाने समजावून सांगितल्यावर मुलं आपल्या पालकांचे ऐकतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास देखील वाढतो.
मुलं रात्री लवकर झोपत नाहीत, किरकिर-दंगा करतात? ५ टिप्स- मुलं लवकर झोपतील शांत
शाळेबद्दल विचारा
सुरुवातीला मुलांना आणायला व सोडायला जा. त्यांना टिफिनमध्ये त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ खायला द्या. त्यांना शाळेबद्दल गमती - जमती सांगा. मुलं शाळेतून आल्यानंतर, शाळेत काय - काय शिकवले, आज काय नवीन शिकलास याबद्दल विचारा. शिक्षकांना आपल्या मुलाबद्दल विचारा, परंतु मुलांसमोर त्यांच्याशी बोलणे टाळा.
हिंमत द्या आणि स्तुतीही करा
मुलांना शाळेत जाण्यासाठी हिंमत द्या. त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा द्या. त्यांना शाळेत मित्र - मैत्रिणी बनवायला शिकवा. जर मुलं शाळेत काही चांगले करत असतील, लोकांशी बोलत असतील, मित्र बनवत असतील तर त्याचे कौतुक करा. असे केल्याने त्याला धीर मिळेल.