मुलांचा अभ्यास ही अनेक आईंची डोकेदुखी असते. कारण काही मोजकी मुलं सोडली तर बहुसंख्य मुलं अशीच असतात की ज्यांना अभ्यासाला बसवणं, त्यांच्याकडून पुरेसा अभ्यास करून घेणं, हे त्यांच्या आईसाठी मोठं कठीण काम असतं. मुलांच्या शाळेच्या वेळा किंवा आईच्याही ऑफिसच्या वेळी, घरातली कामं यामुळे मग बऱ्याच घरांमध्ये मुलांना संध्याकाळी अभ्यासाला बसवलं जातं. ही संध्याकाळी अभ्यासाला बसण्याची वेळ योग्य आहे का किंवा मग मुलांचं उत्तम पाठांतर व्हावं, केलेला सगळा अभ्यास व्यवस्थित लक्षात राहावा, यासाठी मुलांना अभ्यासाला बसविण्याची योग्य वेळ कोणती ते एकदा पाहून घ्या.... (perfect study times for kids enhancing focus and learning)
अभ्यासासाठी सर्वोत्तम वेळ
याविषयी टाईम्स ग्रुपने दिलेल्या वृत्तानुसार सकाळी १० ते दुपारी २ ही वेळ अभ्यासासाठी सर्वोत्तम आहे. कारण यादरम्यान मेंदू खूप ॲक्टीव्ह असतो. त्यामुळे अभ्यास पटापट होतो आणि केलेला सगळा अभ्यास लक्षात राहतो.
शिवाय अभ्यासाला बसण्याआधी मुलांना जर पौष्टिक नाश्ता दिला, तर त्याचा अधिक चांगला परिणाम मुलांच्या अभ्यास करण्याच्या क्षमतेवर दिसून येतो. शिवाय या वेळेमध्ये असणारा लख्ख सुर्यप्रकाश मुलांचा आत्मविश्वास, सकारात्मकता आणि अभ्यासाचा मूडही वाढवतो.
दुपारी ४ ते रात्री १०
दुपारी ४ ते रात्री १० ही वेळ देखील अभ्यासासाठी चांगली आहे. मेंदूला दुपारची थोडी विश्रांती मिळाल्यानंतर या काळातही तो चांगला ॲक्टीव्ह राहू शकतो.
किचन सिंक तुंबून पाणी साचलं? तातडीने २ उपाय करा- सिंक मोकळं होऊन लगेच पाणी वाहून जाईल
ज्या मुलांची सकाळची शाळा आहे, त्या मुलांनी अभ्यासासाठी ही वेळ निवडावी. या काळातही मुलांना हेल्दी स्नॅक्स देऊन अभ्यासाला बसवावे, त्यामुळे त्यांचा अभ्यास अधिक चांगला होऊ शकतो.
कोणत्या वेळी अभ्यास टाळावा?
पहाटे उठून आपल्यापैकी बऱ्या जणांनी अभ्यास केला आहे. पण पहाटेची वेळ सगळ्यांसाठीच सोयीची ठरेल असे नाही.
ऐकलं का कधी 'पोमॅटो'चं झाड? तरुणाचा भन्नाट प्रयोग, अंगणात लावलं बटाटे आणि टोमॅटो देणारं एकच झाड
बरेच मुलं पहाटे उठून अभ्यास करतात. पण त्यातल्या निम्म्या मुलांना झोप येऊन ते पेंगत असतात. मेंदू खूप ॲक्टीव्ह झालेला नसल्याने, लक्षात कमी राहाते. त्यामुळे झोप पुर्ण करून दिवसाचा अधिकाधिक वेळ अभ्यासासाठी देणे जास्त चांगले.