Join us  

मुलांना भयंकर राग येतो- आदळआपट करतात? बघा मुलांना सतत राग येण्याची कारणं आणि ४ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 3:13 PM

Parenting Tips: हल्लीची मुलं खूपच चिडचिड करतात, खूप हट्टी झाली आहेत, अशी बऱ्याच पालकांची तक्रार असते. काय आहेत नेमकी त्यामागची कारणं...(why are kids becoming aggressive these days?)

ठळक मुद्देतज्ज्ञ सांगतात चिडचिड्या मुलांना अतिशय संयमाने हाताळावं लागेल. ते चिडले असतील तर पालकांनी आणखी जास्त चिडून त्यावर तोडगा निघणार नाही. त्यामुळे मुलं चिडले तर पालकांनी थोडं संयमाने घ्यावं.

हल्ली आपण बघतो की काही मोजके अपवाद सोडले तर बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की त्यांची मुलं खूप जास्त हट्टी झाली आहेत. त्यांनी जी गोष्ट मागितली ती त्यांना पाहिजेच असते. थोडं मनाविरुद्ध झालं तरी मुलांचा लगेच ताल जातो. ते भयंकर चिडचिड करतात. त्यांना खूप राग येतो. असं नेमकं हल्लीच्या पिढीसोबत का होत आहे? अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे मुलांच्या स्वभावात असा बदल होत आहे? (why are kids becoming aggressive these days?)

तज्ज्ञ सांगतात...

१. मुलांचा स्वभाव चिडका, किरकिरा होत जाण्यामागे अनेक कारणं आहेत. मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की मुलं जर खूपच जास्त चिडचिड करत असतील तर त्यासाठी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ऑटीझम, ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर, ADHD म्हणजेच अटेंशन डेफिसिट हायपरॲक्टीव्हिटी डिसऑर्डर अशी कारणं असू शकतात. 

दीपिका पादुकोणप्रमाणेच बाळंतपणानंतर महिना भरातच कामावर रुजू झालेल्या ५ बॉलीवूड अभिनेत्री- जिद्दीला सलाम

२. त्याचप्रमाणे कुटूंबात सगळे सुरळीत नसणे, पालकांचा स्वभाव किंवा त्यांची मुलांशी वागण्याची  पद्धत, घरातील बंदिस्त वातावरण, खेळायला समवयस्क मुलं किंवा भावंडं नसणे, पालकांकडून होणारे अतिलाड किंवा अतिशिस्त या कारणांमुळेही मुलांचा स्वभाव किरकिरा होऊ शकतो. 

 

मुलं चिडत असतील तर त्यांना कसं शांत करावं...

१. तज्ज्ञ सांगतात चिडचिड्या मुलांना अतिशय संयमाने हाताळावं लागेल. ते चिडले असतील तर पालकांनी आणखी जास्त चिडून त्यावर तोडगा निघणार नाही. त्यामुळे मुलं चिडले तर पालकांनी थोडं संयमाने घ्यावं.

पिगमेंटेशन कमी होऊन दिवाळीपर्यंत चेहऱ्यावर येईल सुपर ग्लो! आठवड्यातून दोनदा 'हा' उपाय करा

२. मुलं चिडलेले असताना त्यांना काहीही समजवायला जाऊ नका. ते जेव्हा शांत असतील, आनंदी असतील तेव्हा त्यांना त्यांची चूक सांगा. 

३. तुम्हीही मुलांशी असेच वागता का, त्यांच्यावर ओरडता का किंवा घरातल्या अन्य कोणत्या व्यक्तीचं वागणं पाहून ते असे झाले आहेत का हे एकदा तपासून पाहा.

४. काय करायचं नाही यापेक्षा काय करायला पाहिजे हे मुलांना समजावून सांगा.  

टॅग्स :पालकत्वलहान मुलं