Lokmat Sakhi >Parenting > दिवसभर झोपूनही बाळ रात्री रडरड-किरकिर करते? नव्या आईसाठी डॉक्टरांचा खास सल्ला...

दिवसभर झोपूनही बाळ रात्री रडरड-किरकिर करते? नव्या आईसाठी डॉक्टरांचा खास सल्ला...

How to stop baby crying at night: Baby sleep cycle correction tips: What to do when baby cries at night for no reason: Newborn baby night crying solutions: बाळ दिवसभर झोपते आणि रात्री जागे राहाते याचे कारण काय? बाळाच्या झोपेची पद्धत आपल्या कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याविषयी डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 13:39 IST2025-04-11T13:38:14+5:302025-04-11T13:39:32+5:30

How to stop baby crying at night: Baby sleep cycle correction tips: What to do when baby cries at night for no reason: Newborn baby night crying solutions: बाळ दिवसभर झोपते आणि रात्री जागे राहाते याचे कारण काय? बाळाच्या झोपेची पद्धत आपल्या कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याविषयी डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

why baby crying in night time baby sleep in day and stay awake at night doctor said know the solution | दिवसभर झोपूनही बाळ रात्री रडरड-किरकिर करते? नव्या आईसाठी डॉक्टरांचा खास सल्ला...

दिवसभर झोपूनही बाळ रात्री रडरड-किरकिर करते? नव्या आईसाठी डॉक्टरांचा खास सल्ला...

बाळ जन्माला आल्यानंतर खरी परीक्षा सुरु होते ती आई-वडिलांची. त्याच्या जन्मापासून ते मोठे होईपर्यंत आपली नुसती तारेवरची कसरत असते.(How to stop baby crying at night) बाळ जन्माला आले की, घरात जितका किलिबिलाटचा आवाज असतो तितकाच रडण्याचा. डॉक्टारांच्या मते बाळाला साधरणत: १२ ते १५ तासांची झोप दिवसभरात आवश्यक असते. ज्यामुळे त्यांच्या मेंदूचा विकास हा चांगला होतो. (Baby sleep cycle correction tips)
बाळ दिवसभर झोपले की, आई सुटकेचा निश्वास टाकला. परंतु अनेकदा दिवसभर झोपूनही बाळ रात्रीचे जागे राहाते.(What to do when baby cries at night for no reason) सहा महिन्याचे होईपर्यंत बाळासाठी आईचे दूध चांगले असं देखील सांगण्यात आलं आहे. नुकत्याच झालेल्या पालकांना असे वाटते बाळ दिवसभर झोपले म्हणजे रात्री देखील ते व्यवस्थित झोपणार. होते याचा उलटच... बाळ रात्री झोपण्याऐवजी ते किरकिर किंवा रडरड करते.(Newborn baby night crying solutions) याचा परिणाम सगळ्यात जास्त आईच्या झोपेवर होतो. बाळ रडू लागले की, आईला जागे राहावे लागते. डोळ्यात कितीही झोप असली तरी बाळाचं संगोपन करण्याकडे तिला लक्ष द्यावे लागते. बाळ दिवसभर झोपते आणि रात्री जागे राहाते याचे कारण काय? बाळाच्या झोपेची पद्धत आपल्या कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल याविषयी डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. 

आई होणं सोपं नाही, पण त्यासारखा आनंदही नाही! गिरिजा सांगते, तिचा पालकत्वाचा प्रवास!

डॉक्टर म्हणतात बाळ दिवसभर झोपते आणि रात्री जागे राहाते यामागे दोन कारणे असू शकतात. बाळाला त्याच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये दिवस आहे की, रात्र हे कळत नाही. हा बदल बाळ जन्माला आल्यानंतर ६ ते ८ आठवड्यांनी होतो. दुसरे कारण असे की, बाळ जेव्हा गर्भाशयात असते तेव्हा आई इतर कामे करते ज्यामुळे पोटातील बाळ आरामात झोपू शकते. ज्यावेळी आई झोपलेली असते तेव्हा बाळाला सक्रिय राहण्यासाठीची वेळ सर्वोत्तम असते. 

">

बाळाची झोप कशी सुधारावी?

1. बाळाच्या झोपेची पद्धत बदलण्यासाठी सगळ्यात चांगला पर्याय असतो तो सूर्यप्रकाश. बाळाला कोवळ्या उन्हात घेऊन जा. यामुळे त्याला दिवस आणि रात्र यातील फरक कळू शकतो. तसेच कोवळ्या उन्हामुळे बाळाच्या मेंदूचा विकास आणि इतर आजारांपासून बाळाचे संरक्षण होते. 

2. डॉक्टर म्हणतात की, बाळाला दिवसभरात ३ तासांपेक्षा जास्त झोपू देऊ नका. त्यांना वारंवार उठवून खाऊ घाला, दूध पाजा. ज्यामुळे ते दिवसा झोपणार नाही. 

3. रात्री झोपण्यापूर्वी बाळाची मालिश करा. त्यांची कपडे बदला. तसेच लाईट देखील बंद करा ज्यामुळे बाळाला रात्री झोपण्याची सवय लागेल. 

4. रात्रीच्या वेळी आईने हलका आहार घ्यावा. बाळाचे पोषण आईच्या दुधात होते. ज्यामुळे जास्त जड आहार आईने केला की, बाळाच्या पोटात दुखते, गॅसेसची समस्या होते. त्यामुळे आईने आहाराची काळजी घ्यावी. 

Web Title: why baby crying in night time baby sleep in day and stay awake at night doctor said know the solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.