Join us  

कारमध्ये स्वत: सिटबेल्ट न लावता मुलांनाही मांडीवर घेऊन बसता? पालकांच्या ६ चुका, जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 4:05 PM

सिटबेल्ट आवश्यक असताना पालक कधीच लहान मुलांना सिटबेल्ट का लावत नाही? (use of seat belt)

ठळक मुद्देकाही वडील तर इतके उत्साही की कार चालवताना मुलांना आपल्या पुढ्यात घेऊन बसतात, त्या मुलाचा हात स्टेअरिंगवर असतो, ते तर फार घातक.

सिटबेल्ट याविषयावर गेले काही दिवस आपण किती चर्चा ऐकली, किती व्हॉट्सॲप फॉरवर्ड. मनात हळहळ, वेदन, दु:ख. काहींना तर त्यातही विनोद सुचले. सोशल मीडियाची तत्काल आणि तात्पुरते व्यक्त होण्याची सवय सोडून देऊ, पण त्यात सिटबेल्ट हा सुरक्षिततेसाठी किती आवश्यक असतो या महत्त्वाच्या मुद्दयाकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. मात्र आपल्याकडे एकुण सिटबेल्ट लावणं, हेल्मेट घालून टू व्हीलर चालवणं यागोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्षच केलं जातं. त्याचं काही जणं समर्थनही करतात. यासाऱ्यात एक मुद्दा मात्र मागे पडतो तो म्हणजे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा. खरंच सांगा, लहान मुलं आपण कारमध्ये घेऊन बसतो तेव्हा किती पालक त्यांना सिटबेल्ट लावतात. (स्वत:ही लावतात?)अनेकांना वाटतं की आपण शहरातच गाडी चालवतो, काय गरज आहे बेल्टची?पण मेंदू तज्ज्ञ सांगतात की ताशी वीस किलोमीटर वेगानं धावणाऱ्या वाहनाला जरी अपघात झाला तरी त्यातून मेंदूला गंभीर दुखापत होऊच शकते.त्यामुळे स्वत:सह मुलांचाही जीव सुरक्षित ठेवायचा तर सिट बेल्ट लावायलाच हवा. आपल्याकडची ट्राफिक, रस्त्यावरचे खड्डे, बेदरकार वाहन चालवणारे पाहता आपणच आपल्या आणि मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यायला हवी.

(Image : Google)

पालक म्हणून तुम्हीही करता या चुका?

१. कार चालवताना मुलांना सिटबेल्ट न लावण्याची चूक अनेक पालक करतात.२. अनेकदा आपले अगदी ६-७ वर्षांचे मूलही आई मांडीतच घेऊन बसते. आई स्वत: तर सिटबेल्ट लावत नाहीच, मुलालाही लावत नाही.३. किंवा आई ड्राइव्ह करत असेल तरी शेजारच्या सिटवर कुणीतरी बाळाला असेच सिटबेल्ट न लावता मांडीत घेऊन बसलेले असतात.४. थोडी मोठी मुलंही हातात फोन घेत, मोबाइल पाहत सिटबेल्ट न लावता बसतात.५. लहान मुलांसाठी स्वतंत्र कारसिट, त्याला बेल्ट हे तर आपल्याकडे चुकूनही पहायला मिळत नाही.६. काही वडील तर इतके उत्साही की कार चालवताना मुलांना आपल्या पुढ्यात घेऊन बसतात, त्या मुलाचा हात स्टेअरिंगवर असतो, ते तर फार घातक.

(Image : Google)

काय करता येईल?

१. एकतर मूल मांडीत घेऊन बसणे टाळा, आधी स्वत: योग्य रीतीने सिटबेल्ट लावा.२. मूल स्वतंत्र सिटवर बसवून त्याला सिटबेल्ट लावाच.३. मूल लहान असेल तर लहान मुलांसाठी मिळते ते कार सिट वापरणे आवश्यक.४. अगदी लहान जवळ जरी कारने जात असाल तरी हे नियम विसरायचे नाहीत.

टॅग्स :पालकत्वकार