Lokmat Sakhi >Parenting > मुलं मोठी होताना आई बाबांशी सतत खोटं बोलतात, त्याची कारणं ४, तुमच्याही घरात असंच होतं का?

मुलं मोठी होताना आई बाबांशी सतत खोटं बोलतात, त्याची कारणं ४, तुमच्याही घरात असंच होतं का?

मुलं खोटं बोलत असतील, पालकांपासून काही लपवून ठेवत (children lie with parents) असतील तर दोष हा फक्त मुलांचाच नसतो. यात आई बाबांचीही काही चूक असते असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे मुलं जेव्हा अशी विचित्र वागतात तेव्हा काही गोष्टींचा विचार पालकांनी केला तर मुलं अशी का वागतात याचं उत्तर त्यांना मिळेल आणि मुलांशी (bonding with children) जवळीक निर्माण करण्याचा मार्गही सापडेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 07:05 PM2022-09-12T19:05:51+5:302022-09-12T19:16:35+5:30

मुलं खोटं बोलत असतील, पालकांपासून काही लपवून ठेवत (children lie with parents) असतील तर दोष हा फक्त मुलांचाच नसतो. यात आई बाबांचीही काही चूक असते असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे मुलं जेव्हा अशी विचित्र वागतात तेव्हा काही गोष्टींचा विचार पालकांनी केला तर मुलं अशी का वागतात याचं उत्तर त्यांना मिळेल आणि मुलांशी (bonding with children) जवळीक निर्माण करण्याचा मार्गही सापडेल.

Why children lie with parents? | मुलं मोठी होताना आई बाबांशी सतत खोटं बोलतात, त्याची कारणं ४, तुमच्याही घरात असंच होतं का?

मुलं मोठी होताना आई बाबांशी सतत खोटं बोलतात, त्याची कारणं ४, तुमच्याही घरात असंच होतं का?

Highlightsआई वडिलांशी नातं घनिष्ठ नसेल तर एका टप्प्यात मुलांचा आई वडिलांवरील विश्वास उडून जातो.आपल्याकडे आई बाबांचं लक्षच नसतं ही भावना त्यांच्या मनात दृढ होवून मुलं आई बांबाशी खोटं बोलतात.प्रत्येक गोष्टीत मुलांना रागवलं जात असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो.

मुलांच्या सर्वात जवळचे असतात ते आई बाबा. आई बाबांकडून आपले सर्व हट्ट पुरवून घेणारी मुलं जेव्हा मोठी व्हायला लागतात तेव्हा त्यांच्या वर्तनात बदल होऊ लागतो. ही मुलं आई बाबांपासून काही गोष्टी लपवतात, खोटं (children lie with parents)  बोलतात. मुलं आपल्याशी असं का वागतात? असा प्रश्न पालकांना पडतो.  यात मुलंच दोषी, मुलांचीच चूक आहे यापध्दतीनं पालक इतरांकडे मुलांच्या तक्रारी (parents complaints about children) करतात किंवा मुलांकडे त्याच नजरेतून बघतात. मुलं खोटं  बोलत असतील, पालकांपासून काही लपवून ठेवत असतील तर दोष हा फक्त मुलांचाच नसतो. यात आई बाबांचीही काही चूक असते असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे मुलं जेव्हा अशी विचित्र वागतात तेव्हा काही गोष्टींचा विचार पालकांनी केला तर मुलं अशी का वागतात याचं उत्तर त्यांना मिळेल आणि मुलांशी जवळीक (bonding with children)  निर्माण करण्याचा मार्गही सापडेल. 

Image: Google

मुलं पालकांशी खोटं का बोलतात?

1. आई वडिलांशी नातं घनिष्ठ नसेल तर एका टप्प्यात मुलांचा आई वडिलांवरील विश्वास उडून जातो.  आई वडील आपल्याला समजून घेणारच नाहीत, आपल्याला परवानगी देणारच नाहीत किंवा अमूक तमूक आई बाबांना कळलं तर ते चिडतील असा समज मुलांमध्ये निर्माण होतो आणि ते पालाकांना काही गोष्टी कळू देत नाहीत किंवा  काही गोष्टींच्या बाबतीत त्यांच्याशी खोटं बोलतात. 

2. मुलं जेव्हा उदास असतात, नाराज असतात, त्यांचा मूड नसतो तेव्हा मुलांना काय झालं याकडे पालकांचं दुर्लक्ष होतं. या परिस्थितीत मुलांना आई बाबांचा सहवास हवा असतो, त्यांनी आपल्याशी बोलावं, आपल्यासाठी वेळ काढावा अशी मुलांची इच्छा असते. पण मुलांच्या या परिस्थितीकडे आई बाबा सरळ दुर्लक्ष करतात किंवा उलट त्यांना ओरडतात, रागावतात, फटकारतात. त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. मुलं घाबरतात. त्यांना मनातून आई बाबांचा राग येतो. त्यांच्याशी काही शेअर करु नये, त्यांन काही सांगू नये असं त्यांना वाटतं. आपल्याकडे आई बाबांचं लक्षच नसतं ही भावना त्यांच्या मनात दृढ होवून मुलं आई बांबाशी खोटं बोलतात. 

Image: Google

3. प्रत्येक गोष्टीत मुलांना रागवलं जात असेल, त्यांना जाब विचारला जात असेल तर त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. मुलं आपल्यापासून मनानं दुरावू नये यासाठी आधी मुलं काय म्हणताय, त्यांनी काय केलं हे शांतपणे समजून घेऊन त्यांच्याशी शांतपणे संवाद साधावा. तरच मुलांमध्ये पालकांबद्दल विश्वास निर्माण होतो असं बाल मानसशास्त्रज्ञ सांगतात.

4. मुलांसमोर आई वडिलांची सतत भांडणं होत असतील तर मुलं आधी घाबरतात. हे रोजचं असेल तर वैतागतात. त्यांना सतत भांडणाऱ्या आई वडिलांबद्दल मनात राग निर्माण होतो. याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होवून ती घरात असली की उदास राहातात. त्यांना पालकांशी काही बोलावंसं वाटत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे मुलं अनेक गोष्टी आई बाबांना सांगत नाही. ते चिडतील, ओरडतील, मारतील या भीतीनं त्यांच्यापासून गोष्टी लपवून ठेवतात. 

Web Title: Why children lie with parents?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.