Join us  

मुलं अभ्यास का करत नाहीत? 'हे' कारणं आईबाबांनी समजून घेतलं तर प्रश्नच सुटेल कायमचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 2:42 PM

Why Kids Run Away From Studying Know Common Reasons : How To Make Kids Focus On Studying Avoid These Parenting Mistakes : जर तुमचे मूल अभ्यासापासून दूर पळत असेल तर त्यामागे नेमके कोणते कारण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा....

"अभ्यास कर रे " म्हणून सतत पालक आपल्या मुलांच्या पाठी ओरडत असतात. मुलं वेळच्यावेळी अभ्यास पूर्ण करत नाही म्हणून पालक त्यांच्यावर रागावून, वेळीच धपाटे घालून अभ्यास पूर्ण करायला लावतात. मुलं अभ्यास करत नाही ही जगभरातील सगळ्याचं पालकांची एक कॉमन तक्रार आहे असे म्हटले तरी हरकत नाही. मुलांनी अभ्यास करावा म्हणून पालक काही ना काही ट्रिक्स शोधून काढतात. कधी प्रेमाने तर कधी रागावून, ओरडून, धपाटे देऊन अशा अनेक प्रकारे पालक आपल्या मुलांकडून अभ्यास करून घेतातच(Why Kids Run Away From Studying Know Common Reasons).

पालकांच्या दृष्टिकोनातून पाहायला गेले तर मुलांना अभ्यासाच्या सर्व सुखसुविधा असून देखील मुलं अभ्यास करायचा कंटाळा करतात किंवा अभ्यासापासून लांब पळतात. मुलांना खरंच अभ्यासात का रस वाटत नाही किंवा ते अभ्यास करण्याला नको म्हणण्याची अनेक कारणं असू शकतात. खरंतर आपले मुलं अभ्यास करायला का नको म्हणतं आहे याचे मुख्य कारण नेमके कोणते आहे ते पालकांनीच शोधले पाहिजे. ही कारणं कोणती आहेत हे समजल्याशिवाय मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण होणार नाही, परिणामी मुलं अभ्यास करायला तयार होणारच नाहीत. मुलं अभ्यास म्हटलं की का दूर पळतात याची कारणं काय असू शकतात ते पाहूयात(Why Kids Run Away From Studying Know Common Reasons). 

मुलं अभ्यासापासून दूर पळतात कारण.... 

१. आपल्याला अभ्यासावरुन कुणी टोमणा मारेल याची भीती असते :- जर आपल्या मुलाने अभ्यास करताना काही चूक केली आणि तुम्ही प्रत्येकवेळी त्याच्या चुकांबद्दल त्याला फटकारायला लागलात तर याची त्याला भीती वाटू शकते. असे वारंवार केल्याने त्याच्या मनात अभ्यासाविषयी नकारात्मक भावना निर्माण होऊ शकते. यामुळे पुढच्या वेळेपासून आपले मुलं अभ्यासापासून दूर पळू लागेल. यासाठीच मुलांचा अभ्यास घेताना त्यांच्या अडचणी किंवा मुलं कुठे चुकत आहे हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. यासाठी त्याला प्रत्येकवेळी ओरडण्याऐवजी समजून त्याच्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्याला मदत केली पाहिजे. यामुळे हळुहळु मुलांच्या मनात अभ्यासाविषयी गोडी निर्माण होऊ लागेल व मुलं स्वतःच आवडीने अभ्यास करु लागेल. 

झोपलेल्या बाळाच्या अंगावर आईबाबा पांघरुण घालतात पण मुलं ते फेकतात, कारण माहिती आहे?

२. मुलांकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवणे :- पालकांना बर्‍याचदा आपल्या मुलांकडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा असतात. ज्यामुळे पालकांच्या या अपेक्षांचा ताण  मुलांवर पडतो. जेव्हा मूल त्या अपेक्षांवर खरे उतरण्यास असमर्थ असते, तेव्हा ते मुलं अभ्यासापासून दूर पळून जाण्यास सुरुवात करते. यासाठीच पालकांनी आपल्या मुलांकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नयेत. 

३. मुलांना सतत लेबलिंग करणं :- मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारचे लेबलिंग करणे थांबवा. तू नालायक, आळशी, ढ आहेस किंवा तू वर्गातून पहिलंच आलं पाहिजे, कोणत्याही परीक्षेत कायम पहिला क्रमांकच आला पाहिजे, अशा अनेक प्रकारचे 'लेबलिंग' करणे थांबवा. यामुळे मुलांच्या मनावर याचा वाईट परिणाम झालेला दिसून येतो. मुलांना कायम अशा प्रकारचं लेबलिंग केल्याने त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव टाकल्यासारखे वाटते, या दबावामुळे त्यांना अभ्यास नकोसा वाटायला लागतो आणि यामुळेच मुलं अभ्यासापासून दूर पळतात.

४. मुलांना अभ्यासात रस नसणे :- मुलांना जर एखादा विषय आवडत नसेल, अवघड किंवा कंटाळवाणा वाटत असेल तरी देखील मुलं अभ्यास करण्यापासून लांब पळतात. मुलांना जर एखादा विषय येत नसेल किंवा त्या विषयाचे ज्ञान कमी पडत असेल असे झाले तरीही अभ्यासातील आवड कमी होते. मुलांची आवड समजून घेणे आणि त्यानुसार त्याला अभ्यासात सहभागी करून घेणे ही पालकांची जबाबदारी आहे. एखादा विषय कठीण जात असल्यास तो विषय सोपा करण्यासाठी मुलांना काही टिप्स आणि ट्रिक्स शिकवून तो सोपा करावा. यामुळे मुलांच्या मनातील त्या विषयाची भीती कमी होऊन त्यात गोडी निर्माण होईल यामुळे मुलं अभ्यास करु लागेल. 

५. अभ्यासाच्या वातावरणाचा अभाव :- घरात अभ्यासाचे योग्य वातावरण नसेल तर मूल अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. जर मुलांचे अभ्यासाकडे  लक्ष नसेल तर अभ्यास म्हणजे त्यांना कंटाळवाणा वाटतो, यामुळे देखील मुलं अभ्यास करत नाहीत. अभ्यास करताना एक व्यवस्थित आणि शांत वातावरण असणाऱ्या जागेची निवड करा. या शांत वातावरणांत बसून तुम्ही मुलांचा अभ्यास घ्या, त्यांना अभ्यासात मदत करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाचे मन अभ्यासात एकाग्र करू शकता यामुळे त्याला अभ्यास कारण्याची आवड लागेल आणि मुलं स्वतःहून अभ्यास करायला लागेल.

टॅग्स :पालकत्व