आई बाबा कौतुक करतात की तुलना हेच मुलांना अनेकदा कळत नाही. तुझा अमूक मित्र फार छान चित्र काढतो असं म्हंटलं किंवा अमूक चांगला खेळतो, तमूक हुशार आहे असं म्हंटलं तरी मुलांना राग येतो. ते लगेच म्हणतात की आईबाबा इतरांशी माझी तुलना करतात. पालकांनाही हरप्रकारे सांगितले जातेच की तुमच्या मुलांची इतर मुलांशी तुलना करुच नका.
पण अनेकदा पालक तुलना न करता केवळ कौतुक करत असतात किंवा उदाहरण देत असतात. त्यातून मग घरात रुसवे फुगवे होतात. विशेषत: वयात येणाऱ्या मुलांच्या बाबतीत ते घडतेच. मग प्रश्न असा आहे की आईबाबांनी मुलांना समजवायचं कसं?
आपल्या आई वडिलांनी आपलं सोडून इतर कोणाचं कौतुक करु नये असं प्रत्येक मुला मुलीलाच वाटतं. आणि आपल्या मुलांमध्ये सगळे चांगले गुण असावेत असं आई बाबांना वाटतं. जर त्यांना कोणाची एखादी चांगली गोष्ट आवडली तर ते त्याचं/ तिचं तोंडभरुन कौतुक करतात, आपल्या मुलांना तसं वागण्याचा सल्ला देणार, हे साहजिकच. पण एका चुकीमुळे अर्थाचा अनर्थ होतो. आई बाबा जे मित्र मैत्रिणींबद्दल चांगलं बोलतात त्याकडे अनेकदा मुलं तुलना म्हणून बघतात. मग आई बाबा काय सांगतात याकडे दुर्लक्ष तर होतंच आणि सोबतच त्यांना त्यांच्याच जवळच्या मित्र मैत्रिणींचा देखील राग यायला लागतो, त्यांच्याबद्दल हेवा वाटायला लागतो.
(Image : google)
अशावेळी...
१. आईबाबांनाही सतत इतरांची उदाहरण देऊ नये.
२. आपण कौतुक करतोय असं वाटतं पण त्यामुळे आपल्या मुलांना कॉम्प्लेक्स येतो का हे पहावं.
३. आईबाबांनी मुलांशी स्पष्ट बोलायला हवं. मुलांना कसला त्रास होतो हे समजून घेऊन, त्यांना प्रेमाला सांगायला हवं की आई बाबा मुद्दाम आपल्या मुलांची तुलना कोणाशी करत नसतात.
४. मुलांच्या मित्रांचं अती कौतुक किंवा अती टिका टाळावी, मात्र मुलांनाही हे समजावून सांगावं की इतरांचे चांगले गुण घेणं, शिकणं चांगलं. स्पर्धा नको तसा अनाठायी आळसही नको.