Lokmat Sakhi >Parenting > Why Don't Children Respect Their Parents : मुलं ऐकतच नाही, उलट उत्तरं देतात? ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धट वागतात मुलं

Why Don't Children Respect Their Parents : मुलं ऐकतच नाही, उलट उत्तरं देतात? ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धट वागतात मुलं

Why Don't Children Respect Their Parents : मुलं मोठी होत असताना तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यातही अनेक बदल घडतात. अशा स्थितीत कधी-कधी ते स्वत:च्या भावना समजून घेत नाही आणि काही गोष्टींवर रागावतात किंवा आई-वडीलांचा अनादर करतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 03:58 PM2022-06-08T15:58:26+5:302022-06-08T16:12:03+5:30

Why Don't Children Respect Their Parents : मुलं मोठी होत असताना तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यातही अनेक बदल घडतात. अशा स्थितीत कधी-कधी ते स्वत:च्या भावना समजून घेत नाही आणि काही गोष्टींवर रागावतात किंवा आई-वडीलांचा अनादर करतात. 

Why Don't Children Respect Their Parents : 5 Reason why kids stop respecting their parents | Why Don't Children Respect Their Parents : मुलं ऐकतच नाही, उलट उत्तरं देतात? ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धट वागतात मुलं

Why Don't Children Respect Their Parents : मुलं ऐकतच नाही, उलट उत्तरं देतात? ५ कारणांमुळे लहान वयातच पालकांशी उद्धट वागतात मुलं

लहान मुलं ही मातीसारखी असतात आणि तुम्ही त्यांना ज्या प्रकारे आकार देता, त्याप्रमाणे ते बनतात. (Parenting Tips) कदाचित हेच कारण आहे की जेव्हा एखादे मूल त्याच्या पालकांचा अनादर करते, तेव्हा पालक स्वतःला दोष देतात. मुलाचे संगोपन करताना त्यांच्याकडून काही चूक झाली आहे असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांना वाईट वाटतं.  इतकंच नाही तर मुलाच्या या वागण्याने त्यांना खूप त्रास होतो. (5 Reason why kids stop respecting their parents)

कदाचित तुम्ही काही छोट्या चुका केल्या असतील ज्यामुळे मुलांच्या वागण्यात बदल होऊ लागला आहे. परंतु मुलाने पालकांचा अनादर करण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. (Reasons Why Kids May Start Disrespecting Parents) वास्तविक, मूल जसजसे मोठे होत जाते, तसतसे त्याची व्याप्ती वाढू लागते. पालकांसोबतच मित्र आणि बाहेरचे जगही त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरू लागते आणि कधी कधी त्याचा परिणाम त्यांच्या वागण्यावरही दिसू लागतो. (How do you know if your child respects you) या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही कारणांबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे मूलं पालकांचा अनादर करून उद्धट वागतात.(Why Don't Children Respect Their Parents)

1) मुलांच्या प्रत्येक मागण्या पूर्ण करणं

जगात क्वचितच असे पालक असतील जे आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. बहुतेक पालक आपल्या मुलांना जे काही हवे ते देतात. मुलांना हवे ते मिळवण्याची सवय झाल्यावर ते त्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीशी तडजोड न करायला शिकतात. जेव्हा असे होते तेव्हा ते त्यांच्या पालकांबद्दलचा आदर गमावतात. एवढेच नाही तर त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही तर ते पालकांचा अनादर करू लागतात.

रोजच्या जेवणात चपाती आधी अन् भात नंतर खाता?  तज्ज्ञांनी सांगितले चांगल्या आरोग्यासाठी खाण्याचे नियम 

2) मुलांसह ओव्हर फ्रेंडली होणं

आजच्या काळात पालकांना मुलांचे मित्र बनण्याचा सल्ला दिला जातो आणि बहुतेक पालक देखील मुलांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक, पालकांना त्यांच्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात आणि त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट उघडपणे सांगावी अशी इच्छा असते. पण यामुळे अनेकदा किरकोळ गैरसमज होतात आणि मुले पालकांना हलक्यात घेतात, ज्यामुळे स्वभावाचा अनादर होतो. मुलांशी मैत्री करणे चांगले आहे पण याची मर्यादा  पालकांना माहीत असली पाहिजे.

जीवघेण्या कॅन्सरचं कारण ठरतात रोजच्या खाण्यातले ६ पदार्थ; वेळीच तब्येत सांभाळा

3) खोटं प्रोमिस

अनेक वेळा मुलांनी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केला तर पालक त्यांना शांत करण्यासाठी खोटी आश्वासने देतात. त्यांना पटवून देण्यापेक्षा खोटी आश्वासने देणे अधिक योग्य समजतात. तुम्ही ते वचन विसरलात तरी तुम्ही त्यांना दिलेले वचन मुलं विसरत नाहीत. अशा स्थितीत खोट्या आश्वासनांमुळे मुले आपल्या पालकांवर अविश्वास ठेवतात आणि त्यांचा अनादर करू लागतात.

4) मूड स्विंग्स

मुलं मोठी होत असताना तेव्हा त्यांच्या मानसिक आरोग्यातही अनेक बदल घडतात. अशा स्थितीत कधी-कधी ते स्वत:च्या भावना समजून घेत नाही आणि काही गोष्टींवर रागावतात किंवा आई-वडीलांचा अनादर करतात.  म्हणून, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या मनाची स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.

5) लक्ष न देणं

काही मुलांना त्यांच्या पालकांचे विशेष लक्ष हवे असते. परंतु जेव्हा त्यांच्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, तेव्हा ते कधीकधी त्यांच्या पालकांचा अनादर करतात कारण पालक त्यावर त्वरित प्रतिक्रिया देता. अशा स्थितीत अनादर केल्यानं ते तुमचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करू शकतात. त्यामुळे कालांतराने त्यांची वागणूक बदलू लागते.
 

Web Title: Why Don't Children Respect Their Parents : 5 Reason why kids stop respecting their parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.