Lokmat Sakhi >Parenting > ९ वर्षांच्या मुलांनी केला बाॅम्बब्लास्टचा प्लान, शिक्षिकेला मारण्याचा घाट; मुलांना ‘इतका’ राग का येतोय?

९ वर्षांच्या मुलांनी केला बाॅम्बब्लास्टचा प्लान, शिक्षिकेला मारण्याचा घाट; मुलांना ‘इतका’ राग का येतोय?

How To Control Anger In Kids? मुलांचा राग एवढ्या टोकाला का जात असावा, काय कारणं असू शकतात त्यामागे? (how to handle angry kids?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 16:52 IST2025-02-27T16:51:49+5:302025-02-27T16:52:36+5:30

How To Control Anger In Kids? मुलांचा राग एवढ्या टोकाला का जात असावा, काय कारणं असू शकतात त्यामागे? (how to handle angry kids?)

why kids get so much angry, how to control anger in kids, main reasons behind angry behaviour of kids  | ९ वर्षांच्या मुलांनी केला बाॅम्बब्लास्टचा प्लान, शिक्षिकेला मारण्याचा घाट; मुलांना ‘इतका’ राग का येतोय?

९ वर्षांच्या मुलांनी केला बाॅम्बब्लास्टचा प्लान, शिक्षिकेला मारण्याचा घाट; मुलांना ‘इतका’ राग का येतोय?

Highlights मुलांच्या संतापीपणाचे बरेच किस्से हल्ली ऐकायला येत आहेत. मुलांमध्ये असा बदल होण्यामागे नेमकी काय कारणं असू शकतात?

मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपल्याकडे म्हटलं जातं. मुलांचा निरागसपणा, त्यांचा बालिशपणा याचं कौतूकही होतं. मुलांच्या मनात कसलाही राग नसतो, ते पटकन मनातलं बोलून मोकळी होऊन जातात आणि पुन्हा गोड बोलून आपल्या गळ्यातही पडतात.. हे आपण आजवर ऐकत आलो, पाहात आलो आणि अनुभवतही आलो. पण छत्तीसगडमधील एका शाळेत जी घटना घडली त्यावरून मुलांचा बालिशपणा, निरागसपणाही हळूहळू संपत चालला आहे का? ती सुद्धा डोक्यात राग घालून हिंसक होत आहेत का? असं वाटायला लागलं आहे. त्या मुलांनी चक्क शाळेत सोडियमचा बॉम्ब फोडून शिक्षिकेचा बदला घेण्याचा प्रयत्न केला.. ही गोष्ट अतिशय कहरी असून मुलांच्या संतापीपणाचे बरेच किस्से हल्ली ऐकायला येत आहेत. मुलांमध्ये असा बदल होण्यामागे नेमकी काय कारणं असू शकतात?(How To Control Anger In Kids?)

 

मुलं का रागीट, संतापी होत आहेत?

सध्या आपल्या आजुबाजुला आपण असे कित्येक पालक पाहात आहोत जे मुलांच्या रागीटपणामुळे, चिडचिडेपणामुळे वैतागलेले आहेत. मुलांना शांत करण्यासाठी नेमकं काय करावं हे त्यांना समजत नाही.

जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला- वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे

मुलांच्या थोडं मनाविरुद्ध झालं, त्यांना कोणत्या बाबतीत हटकलं की मुलं त्यांचं रागाचं अस्त्र बाहेर काढतात आणि संताप करतात. चारचौघांत मुलांचं असं वागणं लाजिरवाणं होऊन जातं. त्यामुळे मग पालकही नाईलाजाने त्यांचं ऐकतात, मुलांच्या मनाप्रमाणे वागतात. पालकांकडून होणारे अतिलाड हे एक मुलांचा राग पोसला जाण्याचं कारण असू शकतं का?

 

हल्ली मुलांचे खेळसुद्धा खूप बदलले आहेत. त्यांचे कित्येक व्हिडिओगेम्स, मोबाईल गेम्स असे आहेत ज्यामध्ये आपल्या विरोधात असणाऱ्या व्यक्तीला किक आणि फाईट करूनच पुढे जायचं असतं. कधी कधी ते गेम खेळताना मुलं एवढी आवेशात येतात की मोबाईल, व्हिडिओगेमची बटणंही करकचून दाबतात..

घरकामातूनच व्यायाम होतो- जीम, योगाची काय गरज; असं तुम्हालाही वाटतं? बघा हे योग्य आहे की....

या खेळांचा मुलांवरचा प्रभाव वाढल्यानेही त्यांच्यातली आक्रमकता वाढली असावी का? या खेळांमुळे जो आवडत नाही त्याला चोप द्यायचा, त्याच्यावर राग काढायचा हे सगळं त्यांना खूप सोपं वाटून खरंखुरं आयुष्यही असंच असतं हा त्यांचा भ्रम तर झाला नाहीये ना? त्यात त्यांच्या हातात इंटरनेटचा खुळखुळा असतोच. त्यावर ते काय पाहतात, काय ऐकतात यावर कोणाचंही नियंत्रण नाही.

लिंबाचा रस ३- ४ महिने साठवून ठेवण्याचा सोपा उपाय- पाहिजे तेव्हा इंस्टंट लिंबू सरबत तयार...

कारण पालकांना वेळच नाही किंवा वेळ असला तरी काही जणांना मुलांची कटकट नकोशी वाटते.. मोबाईल घ्या, काय पाहायचं ते पाहा आणि काही वेळ शांत बसा असंही कित्येक पालकांचं वागणं असतं.. या सगळ्या गोष्टीच मुलांची आक्रमकता वाढवून त्यांच्यातला निरागसपणा हरवून टाकण्यासाठी कारणीभूत ठरत नाहीयेत ना?

Web Title: why kids get so much angry, how to control anger in kids, main reasons behind angry behaviour of kids 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.