Join us  

नवजात बाळं रात्री जागतात आणि दिवसा झोपतात.. असं का? त्यावर उपाय काय? वाचा डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2022 6:07 PM

Why Newborns Don't Sleep at Night: आई होणाऱ्या बहुतांश मैत्रिणींना हा अनुभव हमखास येताेच. बघा बाळांचं झोपण्याचं हे चक्र बरोबर आपल्या उलट का असतं...

ठळक मुद्देबहुतांश बाळांच्या बाबतीत असं का होतं, नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या झोपेचं चक्र हे आईच्या झोपेच्या अगदी उलट का असतं?

गरोदर असणाऱ्या अनेक जणींना आता झोपून घे, नंतर बाळ झालं की झोप होणार नाही.. हा प्रेमळ सल्ला हमखास मिळतोच. त्यामागचं कारणही तसंच असतं. कारण सल्ला देणाऱ्या बहुतांश मैत्रिणींनी त्या नुकत्याच आई झाल्या तेव्हा हा अनुभव घेतलेला असतो. रात्री आपले डोळे झोपेने जड होऊ लागले की त्यावेळी नेमकं बाळ टक्कं जागं होतं आणि खेळू लागतं. त्याउलट दिवसभर मात्र छान झोप काढतं. बहुतांश बाळांच्या बाबतीत असं का होतं (Why Newborns Don't Sleep at Night), नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या झोपेचं चक्र हे आईच्या झोपेच्या अगदी उलट का असतं? याविषयी बघा डॉक्टरांनी शेअर केलेली ही खास माहिती. 

नुकतीच जन्मलेली बाळं रात्री जागतात आणि दिवसा झोपतात, असं का?याविषयी डॉ. पार्थ यांनी dr.parth_peds या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर एक महत्त्वपूर्ण माहिती शेअर केली आहे. यामागचं कारण सांगताना ते म्हणतात की बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा दिवसभर आई कामात असल्याने बाळ कायम एका मुव्हिंग पोझिशनमध्ये असतं.

थंडीमध्ये प्यायलाच हवं मुगाच्या डाळीचं हेल्दी सूप.. पाहा जुही परमारने शेअर केलेली सोपी रेसिपी

जसं झोळी किंवा पाळणा हलवल्यावर बाळाला झोप लागते, तसंच आईची दिवसभर हालचाल होत असल्याने बाळ पोटात झोपी जातं. रात्री झोपल्यावर आईची हालचाल होत नाही. त्यामुळे त्यावेळी मग बाळ जागं असतं. हेच त्याचं चक्र जन्माला आल्यानंतरही सुरू असतं. कारण त्याचा मेंदू सुरूवातीला दिवस- रात्र यांच्यातला फरक ओळखू शकत नाही. त्यामुळे बहुतांश बाळं रात्री जागी असतात आणि दिवसा झोपतात.

 

यावर उपाय काय?यावरचा उपाय सांगताना डॉक्टर म्हणतात की बाळ जेव्हा दिवसा झोपलेले असतील तेव्हा खोलीतला लाईट सुरू ठेवा किंवा पडदे उघडून खोलीत पुरेसा उजेड येईल असं काही करा.

विश्वकप जिंकताच मेस्सीची पत्नी झाली इमोशनल, बघा तिची व्हायरल पोस्ट आणि दोघांची अनोखी लव्हस्टोरी

आणि रात्री बाळ जागं असलं तरी खोलीतला लाईट मंद असू द्या. यामुळे बाळाला हळूहळू दिवस- रात्र यातला फरक लक्षात येईल आणि त्याचं झोपेचं चक्र बदलण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलं