Join us  

लेक १२ वर्षांची झाल्यानंतर आधी ५ गोष्टी शिकवा; आत्मविश्वास वाढेल-हूशार, खंबीर होईल मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 6:08 PM

Tech These Skills To Your 12 Years Old Daughter : मुलांप्रमाणेच मुलींनाही त्यांच्या वयाच्या हिशोबानं  काही स्किल्स शिकवायला हवेत.

मुलांच्या त्यांच्या वयाच्या हिशोबानं स्किल्स शिकवणं गरजेचं आहे (Parenting Tips). यामुळे त्यांच्या विकासात फायदे होतात आणि आत्मविश्वास वाढतो. ज्या प्रकारे लहान मुलांना हळूहळू त्यांच्या हातानं खाण्याची सवय लावली जाते. त्याचप्रमाणे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांनी काही स्किल्स शिकवणं गरजेचं आहे. काही ठिकाणी मुलं आणि मुलींचं पालनपोषण वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. म्हणूनच मुलांप्रमाणेच मुलींनाही त्यांच्या वयाच्या हिशोबानं  काही स्किल्स शिकवायला हवेत. मुलगी १२ वर्षांची झाल्यानंतर तिला काही गोष्टी शिकवायला हव्यात. (You Should Tech These Skills To Your 12 Years Old Daughter)

1) वेळेचे महत्व

दिल्ली पब्लिक स्कूल गाजियाबाद सोसायटीच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार तुम्ही आपल्या मुलांना टाईम मॅनेजमेंट जितक्या लवकर शिकवाल तितकं चांगलं ठरेल. मुलं आपलं काम वेळेत पूर्ण करतील आणि रोजची कामं सहज पूर्ण करू शकतील. मुलांमध्ये टाईम मॅनेजमेंटचं स्किल विकसित  करण्याचं काम पालकांचेच असते.

2) कोणावर विश्वसा ठेवावा?

आजकालच्या काळात मुलांना हे शिकवणं खूप गरजेचं आहे की विश्वास कोणावर ठेवावा. मुलींसोबत होणाऱ्या चुकीच्या घटना वाढत असत असताना तुम्ही मुलींना वेळीच अनोखळी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये ही शिकवण द्या.  कुटूंबातील कोणत्याही व्यक्तीचा स्पर्श अनइजी वाटत असेल तर त्वरीत कळवायला सांगा.

विंचरताना केसांचे पुंजके निघतात-खूप पातळ झाले? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय, दाट होतील केस

3) सहानुभूती

मुली १२ वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना इतरांप्रती सहानुभूतीची भावना ठेवण्यास शिकवा. त्यांना सांगा की एकमेकांच्या अडचणी समजून घेऊन गरजवंत लोकांची मदत करायला हवी.

4) भावना समजून घेणं

१२ वर्षांचं वय फार नाजूक असते.  याचवेळी मुलं टिनएज ग्रुपमध्ये पाऊल ठेवतात या वयात त्यांच्यातील  भाावनात्मक रूपात बदल होतात ते कोणत्याही व्यक्तीप्रती आकर्षक होऊ शकता किंवा त्यांना एखादी व्यक्ती आवडू शकते. या वयात मुली चुकीचं पाऊल उचलू शकतात. म्हणून मुलींना आधी आपल्या नंतर इतरांच्या भावना समजून घेण्याची शिकवण द्या. 

पाय काळवंडले? फक्त १ रूपयांच्या शॅम्पूनं दूर करा पायांचा काळेपणा; सुंदर-उजळ दिसतील पाय

5) अभ्यासावर लक्ष द्यायला हवं

मुलींनी शिकणं फार महत्वाचे आहे. यामुळे त्यांना आपल्या पायांवर उभं राहायला मदत होते आणि त्या आपल्या गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहत नाहीत.  १२ वर्षांत मुली समजदार होतात. याचवेळी मुलांना शिकवा की त्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवं. जेणेकरून त्या आयुष्यात यशस्वी होतील.

टॅग्स :पालकत्वलहान मुलं