मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही, या गोष्टी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनल्या आहेत (Parenting Tips). दैनंदिन आयुष्यात या तिन्ही गोष्टींचा वापर होतो (Social Viral). पण आजकाल लोक अधिक करून मोबाईल फोनचा वापर करतात. मोबाईल फोनच्या वाढत्या स्क्रीन टायमिंगमुळे डोळे कमकुवत तर होतातच शिवाय याच्या सवयीमुळे आपण इतर कामं करण्यास विसरून जातो (Child Care). बऱ्याच मुलांना स्क्रीन ॲडिक्शन होतं. ज्यामुळे मुलं जेवण करतानाही मोबाईल फोन पाहण्याचा हट्ट धरतात. या करणामुळे मुलांचं खाण्याकडे कमी आणि मोबाईल फोन पाहण्याकडे लक्ष जास्त असतं.
मोबाईल फोनची सवय मोडण्यासाठी नक्की कोणते उपाय मदत करतील? याची माहिती डॉक्टर मधुमिता एझिलने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत केली आहे(Your Toddler Won't Eat Without a TV or iPad? Here's How we cut it out).
गरबा - दांडिया खेळताना घामाने मेकअप पूर्ण जातो? लक्षात ठेवा १ टीप; मेकअप टिकेल रात्रभ
मुलांची स्क्रीन टायमिंग कमी करण्यासाठी उपाय
स्क्रीन टायमिंग कमी करण्यासाठी मुलांना खेळणी खेळायला द्या. शिवाय पुस्तक वाचण्याची गोडी लावा. यामुळे मोबाईल फोन पाहण्याची सवय कमी होईल. शिवाय टीव्ही पाहण्यासाठी टायमर सेट करा. आणि टायमर बंद झाल्यावर टीव्ही बंद करा. यामुळे मुळे स्क्रीन न पाहता जेवतील.
स्वयंपाकात मुलांची मदत घ्या
मोबाईल फोनची सवय मोडायची असेल तर, मुलांना टीव्हीवर माहितीपूर्ण गोष्टी दाखवा. याशिवाय मुलांची आपण स्वयंपाक करण्यासाठी मदत घेऊ शकता. मुलांना नवनवीन पदार्थ करायला शिकवा. मुलांना विविध गोष्टींमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. यामुळे नक्कीच मुलांची मोबाईल फोन पाहण्याची सवय मोडेल.
आई मंदिरात भीक मागत असे, वडील बूटबॉलिश करत मात्र लेक झाली डॉक्टर-वाचा तिच्या जिद्दीची गोष्ट
शरीराचे संकेत समजू शकणार नाहीत
जेव्हा मुल जेवण करतं तेव्हा, त्याला आपण काय खात आहोत आणि किती खात आहोत? हे कळून येत नाही. मुले कधी जास्त तर कधी प्रमाणात खाऊ शकतात. यामुळे पदार्थातील चवही मुलांना कळून येणार नाही. अशावेळी मुलांना स्क्रीन टायमिंग वाढण्याचे तोटे समजावून सांगा.