वांगाच्या डागांमुळे चेहरा खराब दिसू लागला? ३ फळं चेहऱ्याला लावा, काही दिवसांतच डाग गायब
Updated:February 3, 2025 15:57 IST2025-02-03T15:49:29+5:302025-02-03T15:57:06+5:30

बऱ्याच जणींच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग दिसतात. नाकाजवळ, कपाळावर, गालांवर वांगाचे डाग हळूहळू वाढत जातात.(how to get rid of pigmented skin?)
यामुळे मग चेहरा खूपच विद्रूप दिसू लागतो. म्हणूनच तुमच्याही चेहऱ्यावर वांगाचे डाग दिसायला सुरुवात झाली असेल तर आतापासूनच हे काही घरगुती उपाय करायला सुरुवात करा.(3 fruit face pack for reducing pigmentation on skin)
पहिला उपाय म्हणजे केळीची सालं चेहऱ्यावर हळुवारपणे घासून ५ ते ७ मिनिटे मसाज करा. केळीच्या सालांमध्ये असणारे व्हिटॅमिन ए चेहऱ्यावरचे डाग कमी करण्यासाठी मदत करतात.
पपईचा थोडासा गर घ्या आणि तो चेहऱ्याला लावून हलक्या हाताने मसाज करा. यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रसही घालू शकता. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय केल्यास त्वचा छान मऊ होईल आणि हळूहळू चेहऱ्यावरचा ग्लो वाढत जाईल.
वांगाचे डाग कमी करण्यासाठी संत्रीच्या सालींचाही खूप चांगला उपयोग होतो. संत्रीची सालं उन्हात वाळवा आणि त्याची पावडर तयार करा. या पावडरमध्ये दही घाला आणि हा लेप चेहऱ्याला लावून मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. वांगाचे डाग तर कमी होतीलच पण टॅनिंग, डेडस्किन जाऊन त्वचा छान चमकेल.