डोळ्यांभोवती काळी वर्तुळं येण्याची ३ मुख्य कारणं आणि उपाय! डार्क सर्कल्सला करा बाय बाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2024 2:40 PM 1 / 8डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं म्हणजेच डार्क सर्कल्स कमी करायचे असतील तर ते कोणत्या कारणांमुळे येतात, ते माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. (3 major reasons for dark circles)2 / 8त्यासाठी कोणत्या ३ गोष्टी प्रामुख्याने जबाबदार ठरतात, याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे असून त्यासाठीचे काही उपायही सुचविले आहेत. (how to reduce dark circles)3 / 8त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा शरीरातली कोलॅजिन पातळी कमी होते, तेव्हा डार्क सर्कल्स येतात. (home remedies to get rid of dark circles)4 / 8त्याचबरोबर त्वचेखाली तयार होणारे ऑईल डोळ्यांखालच्या भागात साचते तेव्हा डोळ्यांखालचा भाग सुजलेला दिसतो आणि तिथली त्वचा काळवंडते यालाच skin congestion असंही म्हणतात. तर तिसरं कारण म्हणजे पिगमेंटेशन.5 / 8कोलॅजिनच्या कमतरतेमुळे डार्क सर्कल्स झाले असतील तर कच्च्या बटाच्याचा रस, काकडीचा रस आणि पपईचा गर सम प्रमाणात घेऊन त्याने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा.6 / 8पिगमेंटेशनमुळे आलेला काळेपणा कमी करण्यासाठी केशर आणि दूध एकत्र करून डोळ्यांभोवती लावावे.7 / 8तर स्किन कंजेशनमुळे डोळ्यांखालचा भाग फुगीर होऊन काळवंडला असेल तर त्याला कॉफी पावडरमध्ये दूध किंवा पाणी घालून त्या मिश्रणाने मसाज करावा. 8 / 8शुद्ध तूप, ॲलोव्हेरा जेल हे पदार्थ लावून डोळ्यांभोवती नियमितपणे मालिश केली तर डोळ्यांखाली काळी वर्तुळे शक्यतो येत नाही. आणि डोळे जास्त चमकदार, तेजस्वी दिसतात. आणखी वाचा Subscribe to Notifications