1 / 5 काही जणांचे केस एवढे गळतात की गळण्याचं प्रमाण असंच राहीलं तर नक्कीच एक दिवस टक्कल पडेल की काय अशी भीती वाटू लागते. 2 / 5तुमचेही केस असेच गळत असतील तर तुमच्याकडूनही केसांच्या बाबतीत काही चुका होत आहेत का हे एकदा तपासून पाहा. 3 / 5पहिली चूक म्हणजे केसांना नेहमीच खूप जास्त शाम्पू लावणे. केस सिल्की करण्याच्या नादात अनेक जण केसांना गरजेपेक्षा जास्त शाम्पू लावतात. त्यामुळे डोक्याची त्वचा कोरडी पडून केसांतला कोंडा वाढतो. केसांची मुळं कमजोर होतात आणि केस गळू लागतात. 4 / 5दुसरी चूक म्हणजे केसांना तेल लावताना, शाम्पू करताना किंवा धुतल्यानंतर केस टॉवेलने कोरडे करताना अनेक जणी खूप जोरजोरात डोक्याला चोळतात. यामुळे केस मुळाजवळ नाजूक होत जातात आणि ते तुटण्याचं प्रमाण वाढतं.5 / 5तिसरी चूक म्हणजे केसांवर नेहमीच वेगवेगळे शाम्पू, हेअरऑईल, कंडिशनर ट्राय करणे. केसांवर असा वारंवार केमिकल्सचा मारा करणं योग्य नाही. यामुळे केसांच्या अडचणी कमी होण्याऐवजी जास्त वाढत जातात. त्यामुळे केसांवर प्रयोग करणं टाळा तसेच केसांसाठी नेहमी चांगले ब्रॅण्डेड किंवा मग एकदम घरगुती खात्रीचे पदार्थ वापरण्यावरच भर द्या.