न्यू इयर पार्टीसाठी फक्त ३ स्टेपमध्ये घरच्याघरी करा फेशियल- चेहऱ्यावर येईल भरपूर ग्लो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 1:31 PM 1 / 7न्यू इयर पार्टीसाठीची तयारी करायला आता मोजकेच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे गडबडीत अनेक जणींना फेशियल- क्लिनअपसाठी ब्यूटी पार्लरमध्ये जायला वेळच मिळत नाही. 2 / 7अशा वेळी घरच्याघरी फक्त ३ स्टेपमध्ये फेशियल कसं करायचं हे पाहा.. फेशियल करण्याची ही पद्धत अतिशय सोपी आहे. शिवाय त्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे, ते आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असणारं आहे. फेशियल करण्याची ही पद्धत manpreetk0urr या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आली आहे. 3 / 7यासाठी सगळ्यात आधी चेहऱ्याला कोरफडीचा गर लावून मसाज करा. 4 / 7कोरफडीचा गर लावून मसाज केल्यानंतर २ मिनिटांसाठी वाफ घ्या.5 / 7यानंतर बटाट्याचा रस, कॉफी आणि मध एकत्र करा. या स्क्रबने चेहऱ्याला मसाज करा. बटाट्यामुळे त्वचेवरचं टॅनिंग निघून जाण्यास मदत होईल. ५ ते ७ मिनिटे हलक्या हाताने मसाज केल्यानंतर चेहरा धुवून टाका.6 / 7आता शेवटची स्टेप करण्यासाठी तांदळाचे पीठ, चिमुटभर हळद आणि दही हे मिश्रण एकत्र करा आणि हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. फेसपॅक अर्धवट सुकत आला की हळूवार हाताने चोळून चेहऱ्यावरचा फेसपॅक काढून टाका.7 / 7यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि चेहऱ्याला माॅईश्चरायझर लावा. हे फेशियल केल्याने चेहऱ्यावर भरपूर ग्लो येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications