Join us

१५ मिनिटांत घरीच करा राईस फेशियल, एवढा ग्लो येईल की पार्लरमधले महागडे फेशियलही फिके पडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 09:20 IST

1 / 6
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही. अशावेळी घरच्याघरी राईस फेशियल करून पाहा.
2 / 6
फक्त १५ मिनिटांत होणाऱ्या या फेशियलमुळे चेहऱ्यावर एवढा ग्लो येईल की त्यानंतर तुम्ही स्वत:च घरच्याघरी हे फेशियल नियमितपणे कराल.
3 / 6
राईस फेशियल कसं करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ beautywithsaru या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की सुरुवातीला कच्चं दूध आणि मध यांच्या मिश्रणाने चेहऱ्याला २ ते ३ मिनिटांसाठी मसाज करा. यामुळे त्वचेवरचा मळ निघून जाईल आणि त्वचा छान हायड्रेटेड होईल.
4 / 6
यानंतर या मिश्रणात थोडे तांदळाचे पीठ टाका आणि त्याने चेहऱ्याला २ ते ३ मिनिटांसाठी मसाज करा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन निघून जाईल.
5 / 6
यानंतरची तिसरी स्टेप म्हणजे बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि दही हे समप्रमाणात घ्या आणि त्याचा लेप चेहऱ्याला लावा. हा फेसमास्क सुकत आला की हलक्या हाताने चोळून काढून टाका.
6 / 6
यानंतर चेहरा धुवून घ्या आणि व्यवस्थित मॉईश्चराईज करा. चेहऱ्यावर खूप छान ग्लो येईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी