4 simple tips to look young and beautiful even in old age
वय वाढलं तरी सौंदर्य कमी होणार नाही! ४ गोष्टी नेमाने करा, पन्नाशीतही दिसाल पंचविशीतल्या...Published:October 24, 2024 05:23 PM2024-10-24T17:23:52+5:302024-10-24T17:54:21+5:30Join usJoin usNext वाढत्या वयासोबत जर तुमचं सौंदर्य कमी होऊ द्यायचं नसेल तर काही गोष्टी नियमितपणे करणं गरजेचं आहे. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा... तुमच्या त्वचेवर वय वाढल्याच्या खाणाखुणा दिसू द्यायच्या नसतील तसेच तब्येतही एकदम फिट ठेवायची असेल तर काय करावं, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ ब्यूटी एक्सपर्टने doctornaturale या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दररोज सकाळी तुमच्या त्वचेला आईस फेशियल करा. यासाठी बर्फाच्या थंडगार पाण्यात जेवढा वेळ शक्य होईल तेवढाच वेळ चेहरा बुडवून ठेवा. किंवा बर्फाचा तुकडा एका कपड्यात गुंडाळून त्याने चेहऱ्याला मसाज करा. आठवड्यातून ३- ४ वेळा कच्चा बटाटा किंवा बटाट्याची सालं तुमच्या चेहऱ्यावर चोळून मसाज करा. यातून मिळणाऱ्या रेटिनॉलमुळे त्वचेवरचे काळपट डाग, पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स कमी होतात. आठवड्यातून एकदा मेथी दाण्यांचा काढा घ्या. यामुळे त्वचेचा टाईटनेस टिकून राहण्यास मदत होते. दररोज सकाळी चिया सीड्स घातलेले पाणी प्या. यामुळे त्वचेवरची आणि विशेषत: पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. पचन चांगले होते. कोरफडीचा ताजा गर पाण्यात काही तासांसाठी भिजत घाला. हे पाणी चेहऱ्यावर चोळून लावा. यामुळे त्वचा मऊ, नितळ होण्यास मदत होते. टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीBeauty TipsSkin Care TipsHome remedy