1 / 7त्वचेच्या आणि केसांच्या सौंदर्यासाठी कोरफड अतिशय उपयुक्त आहे हे आपल्याला माहिती आहे. पण बऱ्याचदा तिचा उपयोग कसा करायचा हे माहिती नसल्याने तिचा योग्य फायदा करून घेता येत नाही.2 / 7म्हणूनच त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी कोरफडीचा कसा वापर करायचा ते पाहा आणि त्वचेचं सौंदर्य खुलवा. हे सगळे उपाय सांगणारा व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 3 / 7त्वचेवर खूप ओपन पोअर्स असतील तर त्यासाठी १०० मिली गुलाब पाण्यात २ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल मिक्स करा. त्यात थोडं लव्हेंडर इसेंशियल ऑईल टाका. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा हा स्प्रे चेहऱ्यावर मारा. काही दिवसांतच ओपन पोअर्स कमी होतील. 4 / 7चेहऱ्यावर खूप डार्क स्पॉट्स असतील तर ते कमी करण्यासाठी १ चमचा ॲलोव्हेरा जेल घ्या. त्यामध्ये ४ ते ५ काड्या केशर टाका. या मिश्रणाने आता चेहऱ्याला मसाज करा आणि अर्ध्या तासाने चेहरा धुवून टाका. 5 / 7चेहऱ्यावरची डेड स्किन काढून टाकण्यासाठी २ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल घ्या. त्यामध्ये १ टेबलस्पून साखर टाका. या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा. डेड स्किन निघून जाईल. त्वचा मऊ, कोमल होईल. तसेच त्वचेवर खूप छान ग्लो येईल.6 / 7डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आली असतील तर ती घालविण्यासाठी १ चमचा ॲलोव्हेरा जेलमध्ये अर्धा चमचा बदाम तेल टाका आणि या मिश्रणाने डोळ्यांभोवती मसाज करा. काही दिवसांतच डार्क सर्कल्स कमी होतील.7 / 7ॲक्ने कमी करण्यासाठी १ चमचा ॲलोव्हेरा जेलमध्ये ३ ते ४ थेंब टी ट्री ऑईल टाका आणि या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा.