केसांना मजबूत करणारे ५ घटक, हे पदार्थ आहारात नसतील तर केस गळणारच, म्हणूनच आहारात घ्या...... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 3:22 PM 1 / 9केस खूप गळाल्याने पातळ होणं, केसांची वाढ खूपच हळूहळू होणं, किंवा केस कमी वयातच पांढरे होऊ लागणं, अशा केसांच्या विविध समस्या असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढते आहे.2 / 9याला कुठेतरी जबाबदार आहे, ते आपलं बदललेलं रुटीन. आजकाल २० ते ३० या वयोगटातली अनेक मंडळी पोटात काही पौष्टिक घटक गेले पाहिजेत म्हणून नाही, तर पोट भरलं पाहिजे आणि जिभेला काहीतरी यम्मी, चटकदार पदार्थ मिळाले पाहिजेत, म्हणून जेवतात.3 / 9नेमकी हीच तर सवय तुमच्या तब्येतीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी घातक ठरते आहे. आहारातून योग्य पोषण मिळाले नाही, तर केसांची वाढ हमखास खुंटते आणि केसांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.4 / 9त्यानंतर मग केसांवर कितीही महागडे हेअर प्रोडक्ट्स वापरले तरी त्याचा उपयोग होत नाही. उलट त्यातल्या केमिकल्समुळे केसांचे आणखीनच नुकसान होते. त्यामुळे केसांची कोणतीही समस्या असेल, तर तुमच्या शरीरात या काही घटकांची कमतरता आहे, हे आधी लक्षात घ्या आणि त्यानुसार आहारात बदल करा.5 / 9केस गळत असतील, तर तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांची कमतरता आहे. शरीरात लोह पुरेशा प्रमाणात असेल, तर संपूर्ण शरीरात ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचविला जातो. त्याचा फायदा केसांनाही होतोच. त्यामुळे पालक, बीट, हिरव्या पालेभाज्या, डाळिंब हे पदार्थ काही दिवस नियमित खा आणि केसांवर होणारा परिणाम स्वत:च अनुभवा.6 / 9बायोटीन व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे केस खूप गळतात. जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल किंवा एखाद्या आजारामुळे ॲण्टीबायोटिक्सचा डोस सुरु असेल, तर अशावेळी बायोटीन कमी होऊन, केस गळण्याचं प्रमाण वाढू शकतं. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बायोटीन डोस सुरू करणं योग्य असेल.7 / 9केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन सी देखील गरजेचं आहे. त्यासाठी लिंबूवर्गीय फळं, आवळा, सिमला मिरची हे पदार्थ खावेत.8 / 9व्हिटॅमिन डी च्या नियमित सेवनानेही केसांचे गळणे कमी होते. दूध, पनीर, दही या पदार्थांतून तसेच कोवळ्या सुर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळते. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्यानेही व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेऊ शकता.9 / 9सुकामेवा, कडधान्ये यातून मिळणारे झिंक केसांसाठी अतिशय पोषक आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications