फक्त ५ पदार्थ खा- वय झालं तरी त्वचा सुरकुतणार नाही, त्वचेवरची चमक वाढतच जाईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 12:24 PM 1 / 7त्वचा नेहमीच तरुण ठेवायची असेल तर पुढे सांगितलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ तरी तुमच्या आहारात नियमितपणे असायलाच हवेत. 2 / 7हे पदार्थ नेहमीच तुमच्या आहारात असतील तर एजिंग प्रोसेस हळूवार होईल आणि त्वचेवरचा ग्लो मात्र नैसर्गिक पद्धतीने दिवसेंदिवस वाढतच जाईल. यासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत, याविषयीचा व्हिडिओ dr_kratika_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे3 / 7यातला पहिला पदार्थ आहे पपई. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतं. त्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पेपेन हे एन्झाईम त्वचा तरुण ठेवण्यासाठी मदत करतं.4 / 7दुसरा पदार्थ आहे सुकामेवा. सुकामेव्यात असलेले व्हिटॅमिन ई आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्वचा हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे एजिंग प्रकिया खूप हळूवार होऊन त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. यामध्ये बदाम, अक्रोड, चिया सीड्स, जवस, भोपळ्याच्या बिया हे पदार्थ आवर्जून खावेत.5 / 7तिसरे फळ आहे डाळिंब. डाळिंबामध्ये असणारे घटक त्वचेवर खूप छान चमक आणण्यात मदत करतात.6 / 7चौथे आहे पालक आणि ब्रोकोली या हिरव्या पालेभाज्या. या पालेभाज्यांमध्ये आयर्न, झिंक, मॅग्नेशियम आणि ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचा आणि केस दोन्हींचे आरोग्य सुधारते.7 / 7पाचवा घटक आहे लिंबू आणि लिंबूवर्गीय फळं. या फळांमध्ये असणारे व्हिटॅमिन सी चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स कमी करून इव्हन स्किन टोन मिळविण्यासाठी मदत करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications