तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही नेहमी-हमखास ५ चुका करताय का? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 2:42 PM 1 / 8१. केसांना तेल लावून मालिश करणं हे नेहमीचंच काम. पण बऱ्याचदा आपल्याकडून त्यातही चुक होते आणि मग त्याचा केसांवर चुकीचा परिणाम होत जातो.2 / 8२. म्हणूनच ज्यादिवशी आपण केसांना तेल लावून मालिश करतो- केस धुतो, त्यादिवशी जरा जास्तच केस गळालेले आहेत असं दिसून येतं. असं नेमकं का होतं, तेल लावल्यानंतर, केस धुतल्यानंतर ते जास्त गळत असतील, तर नक्कीच आपल्याकडून काही तरी चुकतंय.3 / 8३. म्हणूनच केसांना तेल लावताना कोणत्या चुका करू नयेत, याविषयीचा एक व्हिडिओ thebeautystages या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 4 / 8४. यात दिलेली सगळ्यात पहिली सूचना म्हणजे केसांना तेल लावल्यानंतर लगेचच केस विंचरून गुंता काढू नका. तेल लावण्यापुर्वीच केसांतला गुंता काढून घ्या.5 / 8५. आठवड्यातून फक्त १ किंवा २ वेळाच तेल लावा. त्यापेक्षा जास्त नको.6 / 8६. मालिश केल्यानंतर केसांवर रात्रभर तेल ठेवू नका. २ ते ६ तासांचा वेळ पुरेसा असतो. त्यानंतर केस धुवून टाका. 7 / 8७. केस गळू नयेत किंवा काेंडा कमी व्हावा, यासाठी काही जणी खूप जास्त तेल लावतात. असं खूप तेल लावून केस चिपचिपित करू नका. गरजेपुरतंच तेल लावा.8 / 8८. तेलाने मालिश केल्यानंतर केस खूप ताणून, ओढून घट्ट बांधू नका. अगदी सैलसर ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications