केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे ५ दुष्परिणाम, केस रखरखीत-बेजान झाले असतील तर..

Published:November 29, 2022 06:01 PM2022-11-29T18:01:58+5:302022-11-29T18:10:31+5:30

Winter Hair Care Tips हिवाळ्यात स्कीन आणि केसांची विशेष काळजी घेतली जाते, जर आपण गरम पाण्याचा वापर करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेऊन वापर करा.

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे ५ दुष्परिणाम, केस रखरखीत-बेजान झाले असतील तर..

हिवाळ्यात केसांची गळती होणे ही सामान्य बाब आहे. बदलत्या ऋतूनुसार केसांच्या वाढीमध्ये देखील बदल घडतो. थंडीत सामान्य किंवा थंड पाण्याने अंघोळ करण्याची हिंमत कोणाचीच होत नाही. त्यामुळे गरम पाण्याने अंघोळ करण्यास सगळे प्राधान्य देतात. गरम पाण्याने अंघोळ केल्याने आपण आपल्या शरीराला थंडीपासून वाचवतो. मात्र, अतिगरम पाण्यामुळे आपल्या स्कीनला त्याचा फटका बसतो. स्कीन ड्राय होते. यासह केसांना देखील हानी पोहचते. हिवाळ्यात स्कीन आणि केसांची विशेष काळजी घेतली जाते, जर आपण गरम पाण्याचा वापर करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेऊन वापर करा.

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे ५ दुष्परिणाम, केस रखरखीत-बेजान झाले असतील तर..

हिवाळ्यात केस कोरडे आणि निर्जीव होतात. त्यामुळे हिवाळ्यात केस धुताना अतिगरम पाण्याचा वापर टाळावा. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाणी केसांसाठी वापरले तर केसांना इजा होणार नाही.

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे ५ दुष्परिणाम, केस रखरखीत-बेजान झाले असतील तर..

जर केस खूप कोरडे झाले असतील, तर शॅम्पूनंतर क्रीमी कंडिशनरने केसांना हलके मसाज करा, त्यानंतर दोन मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा. तसेच हिवाळ्यात शॅम्पू केल्यानंतर सीरम लावा. असे केल्याने केसांना नवी चमक मिळेल.

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे ५ दुष्परिणाम, केस रखरखीत-बेजान झाले असतील तर..

केस धुतल्यानंतर टॉवेलने केसांना सुकवू नका. यामुळे केसांचे नुकसान होते. त्यापेक्षा केसांना टॉवेल व्यवस्थित गुंडाळा. केसांमधील पाणी टॉवेल शोषून घेते.

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे ५ दुष्परिणाम, केस रखरखीत-बेजान झाले असतील तर..

प्रसिद्ध हेअर एक्सपर्टनुसार, केस हे नेहमी थंड पाण्यानेच धुवावे. थंड पाण्याने केस धुतल्याने शॅम्पू सहजपणे निघतो. पाणी थंड असण्यासोबतच पाण्याच्या क्वालिटीची देखील काळजी घेणे तितकेच गरजेचं आहे.

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे ५ दुष्परिणाम, केस रखरखीत-बेजान झाले असतील तर..

केसांसाठी गरम पाणी फायदेशीर नाही त्याचे दुष्परिणाम अनेक आहेत. थंडीत केसांना गरम आणि शरीराला थंड असा पाण्याचा वापर करत असाल, तर तसं करू नका. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होईल.

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरण्याचे ५ दुष्परिणाम, केस रखरखीत-बेजान झाले असतील तर..

गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. आयुर्वेदानुसार डोक्यावर गरम पाणी घेऊन आंघोळ करू नये. त्यामुळे टाळूमध्ये कोंड्याची समस्या वाढते. व केस पातळ देखील होतात.