तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

Updated:December 19, 2024 16:14 IST2024-12-19T15:29:51+5:302024-12-19T16:14:20+5:30

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

हिवाळ्यात तळपायांच्या भेगा खूपच वाढतात. त्यामुळे तळपाय अगदी खरखरीत होऊन जातात (Winter Foot Care Tips). त्वचा काेरडी पडल्यामुळे अगदी काळवंडून गेलेले दिसतात.(how to remove tanning and dead skin from feet)

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

अशा पायांसाठी पार्लरमध्ये जाऊन कोणतीही महागडी ट्रिटमेंट घेण्यापेक्षा घरीच अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्य वापरून पेडिक्युअर करा. पायांचा खरखरीतपणा, काळेपणा जाऊन पाऊलं अगदी नाजूक, सुंदर दिसतील. घरच्याघरी पेडिक्युअर कसं करायचं, याविषयीचा व्हिडीओ syedakainat20 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.(5 step pedicure at home)

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

सगळ्यात आधी एका टबमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये बेकिंग सोडा, शाम्पू आणि लिंबाचा रस टाका. १० ते १५ मिनिटे या पाण्यात पाय बुडवून बसा.

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

त्यानंतर पाय स्वच्छ पुसून घ्या आणि ॲलोव्हेरा जेल लावून पायाला मसाज करा. यानंतर dermaplaning razor वापरून पायावरची डेडस्किन काढून टाका.

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

पायावरची डेडस्किन काढून टाकल्यानंतर त्यावर तांदळाचं पीठ, मुलतानी माती आणि गुलाबपाणी यांच्यापासून तयार करण्यात आलेला लेप लावा. हा लेप १५ मिनिटे पायावर राहू द्या आणि त्यानंतर चोळून काढून टाका.

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

पाय स्वच्छ धुतल्यानंतर त्यांना मॉईश्चरायझर लावा आणि १५ मिनिटांसाठी सिलिकॉन सॉक्स घालून ठेवा. सिलिकॉन सॉक्स नसतील तर एखादी जाडसर पिशवी पायाभोवती गुंडाळून टाका.

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

त्यानंतर १५ मिनिटांनी पायाला एखादं सिरम किंवा खोबरेल तेल, बदाम तेल यापैकी काहीही लावून मसाज करा.

तळपाय खूपच खरखरीत होऊन काळे पडले? घरीच करा पेडिक्युअर- पाय होतील मऊ-दिसतील सुंदर

एखादं छानसं नेलपेंट लावलं की बघा तुमचे काळवंडलेले पाय आता किती छान, नाजुक दिसू लागतील..