पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

Published:November 5, 2022 03:59 PM2022-11-05T15:59:42+5:302022-11-05T16:05:07+5:30

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

१. टीनएज (teen age) दरम्यान शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, ॲक्ने येणं खूप कॉमन आहे. पण वयाची २५ ओलांडून तिशी गाठायला आली तरी अनेकींच्या चेहऱ्यावरून पिंपल्स आणि ॲक्ने काही जात नाहीत.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

२. साधारण २५ ते ३० या वयोगटातल्या महिलांमध्ये आता पिंपल्स आणि ॲक्ने येण्याचं प्रमाणही बरंच वाढलं आहे. या वयात चेहरा अशा पद्धतीने खराब का होतो आणि त्यावरचे नेमके उपाय काय, याविषयी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

३. या पोस्टमध्ये ऋजुता म्हणतात की टिनएजमध्ये चेहऱ्यावर जे पिंपल्स आणि ॲक्ने येतात, त्यांचे डाग काही दिवसांनंतर नाहीसे होतात. पण प्रौढ वयात येणाऱ्या पिंपल्स आणि ॲक्नेचे डाग मात्र महिनोंमहिने चेहऱ्यावर तसेच राहतात. त्यामुळे हा त्रास होऊच नये, यासाठी पुढील काही उपाय त्यांनी सुचविले आहेत.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

४. खूप ताण घेण्याची सवय असेल तर त्या वाढत्या ताणामुळे शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण सातत्याने बदलते. त्याचा परिणाम म्हणूनही पिंपल्स, ॲक्ने येऊ शकतात. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करायला शिका. जास्त विचार करू नका. ताण घेऊ नका.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

५. रात्री ९: ३० ते ११ यादरम्यान झोपायला पाहिजे. रोजच्याच जागरणानेही चेहरा खराब होतो.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

६. व्यायाम करणं अतिशय गरजेचं आहे. खास करून पंचविशीनंतर स्ट्रेन्थ ट्रेनिंग व्यायाम केले पाहिजेत. आठवड्यातून १५० मिनिटांचा वेळ व्यायामासाठी अवश्य द्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

७. सुक्या खोबऱ्याचे एक- दोन तुकडे दररोज नियमितपणे खा. त्यातील घटक त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहेत.

पिंपल्स, ॲक्ने यामुळे हैराण? बघा तज्ज्ञ सांगत आहेत ५ जबरदस्त उपाय

८. त्यासोबतच हंगामी फळंही नियमितपणे खा. फळांचा ज्यूस किंवा स्मूथी करून घेण्यापेक्षा थेट फळं खाण्यावरच भर द्या.